aryan khan Arbaaz Merchant  
मुंबई

Drugs Case: आर्यन खान, अरबाज मर्चंटला कारागृहात केलं क्वारंटाइन

जामिनावर न्यायालयात सुनावणी

स्वाती वेमूल

Aryan Khan Drugs Case: क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना आर्थर रोड कारागृहात क्वारंटाइन करण्यात आले आहे. आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र तरीही कारागृहाच्या नियमांनुसार नवीन आरोपींना सुरुवातीचे काही दिवस (पाच ते सहा) क्वारंटाइन केले जाते. त्यानंतर त्यांची रवानगी इतर कारागृहात केली जाते. आर्यन आणि अरबाजमध्ये काही लक्षणं आढळल्यास त्यांना त्यात कोठडीत ठेवलं जाईल. सध्या आर्यन आणि अरबाज यांना नवीन कारागृहातील पहिल्या माळ्यावरील बराक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर आरोपी मुनमुन धामेचा हिला भायखळा कारागृहात हलवण्यात आले आहे.

क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ आरोपींना न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आर्यन खानसह मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट यांना केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) याप्रकरणी पहिल्या दिवशी अटक केली होती. त्या सर्वांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपींना कारागृहात न पाठवता एक दिवस एनसीबी कोठडीतच ठेवण्याची विनंती बचावपक्षाकडून करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली. आर्यनच्या जामिनाबाबत आज (शुक्रवारी) मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होत आहे.

सतीश मानशिंदे यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, त्यांनी एनसीबीला या प्रकरणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची विनंती केली आहे. जामीन नाकारला जावा असे पुरावे एनसीबीकडे नाहीत असा बचाव त्यांनी केला. सतीश मानशिंदे यांनी आर्यनच्या वतीनं युक्तीवाद केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "२३ वर्षीय आर्यनला बॉलिवूड सेलिब्रिटी असल्या कारणानं त्या पार्टीचं निमंत्रण होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करुन तो त्या क्रुझवर गेला होता. त्याला जेव्हा अमली पदार्थांचे सेवन करतो का असे विचारण्यात आले यावर त्यानं त्या गोष्टीला नकार दिला होता. त्याच्याकडे ड्रग्ज आढळले नव्हते."

आर्यन आणि अचित या दोघांच्या व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधअये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा उल्लेख आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि ज्या परिस्थितीत ही सर्व घटना समोर आली, ते काही योगायोग नाही. आर्यनच्या मन्नत या निवासस्थानी अरबाज गेला होता. तिथून ते एकाच कारमधून गेले. हा योगायोग असू शकत नाही. आम्ही आयोजक, पुरवठादार, अचित यांना अटक केली आहे. यांचा एकमेकांशी संबंध आहे हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हा योगायोग असू शकत नाही," असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. ते पुढे म्हणाले, "व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या स्वरूपात पुरेसे साहित्य आहे, जे षड्यंत्रातील आरोपींचा सहभाग स्पष्टपणे दर्शवते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT