Aryan khan e sakal
मुंबई

Drugs Case: शाहरुखला झटका; आर्यनचा जामीन फेटाळला

आर्यनसोबत अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचाही जामीन फेटाळला

स्वाती वेमूल

आता जामिनासाठी उच्च न्यायालयात घेणार धाव

क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा, आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाने आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामीन फेटाळला आहे. आर्यनसह आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांनीसुद्धा विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. एनसीबीने या अर्जाला तीव्र विरोध केला होता. न्यायालयाच्या सुनावणीआधी केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाने (NCB) आर्यन आणि एका बॉलिवूड अभिनेत्रीदरम्यान ड्रग्ज संदर्भात झालेल्या चॅटिंगचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते. २ ऑक्टोबर रोजी हे दोघं ड्रग्जसंदर्भात चॅट करत होते. याच दिवशी आर्यनसह इतर सात जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं.

आर्यन मागील सतरा दिवसांपासून कारागृहात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याच्याकडे ड्रग्ज सापडले नाहीत, केवळ व्हॉटसप चॅटच्या आधारावर त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांनी केला होता. तर एनसीबीच्या वतीने जामिनाला तीव्र विरोध करण्यात आला होता. आर्यन प्रभावशाली कुटुंबातील आहे आणि त्याला जामीन मंजूर झाला तर तपासात बाधा येऊ शकते, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. तसेच आर्यनकडे काही सापडले नसले तरी त्याला अमली पदार्थ घ्यायचे होते आणि तो आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात होता असे गंभीर आरोप केले आहेत.

विशेष न्या. व्ही व्ही पाटील यांनी आज (बुधवारी) या जामिन अर्जावर निकाल जाहीर केला. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. पाटील यांनी एनसीबीचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन नामंजूर केला. त्यामुळे उच्च न्यायालयात आता जामिन अर्ज करण्यात येईल असे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT