मुंबई

खालापूर जवळ मद्यपींचा पराक्रम; सिगारेटमुळे पेट्रोल पंपाजवळ आग

मनोज कळमळकर


खालापूर  : थर्टी फर्स्ट स्मशानात साजरी करण्यासाठी गेलेल्या मद्यपींनी टाकलेली जळती सिगारेट यामुळे वणवा सदृश्‍य आग भडकल्याची घटना खालापुरात घडली. सुदैवाने यात मोठी दुर्घटना टळली असली तरी, कित्येक झाडे होरपळली आहेत.

कोरोना पार्श्वभूमीवर आलेल्या निर्बंधामुळे अनेकांनी सोईच्या जागा शोधत थर्टी फर्स्ट साजरा केला. खालापूर शहरातील काही मद्यपींनीही थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी स्मशानभूमीत पार्टी करत होते. या वेळी त्यांनी जळती सिगारेट सुकलेल्या गवतांवर टाकल्यामुळे आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्यावर मद्यपींनी पळ काढला. मात्र, जवळच असलेल्या पेट्रोल पंपातील कामगारांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी ती विझवली. परंतु, दुसऱ्या बाजूने आग भडकत जाऊन ती नजीकच्या फार्महाऊसमध्ये पसरली. आगीच्या घटनेची माहिती कळताच अपघातग्रस्त मदत पथकाचे हनीफ कर्जीकर आणि खालापुरातील उद्योजक महेश राठी यांनी खोपोलीहून अग्निशामक बंब बोलवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि महेश राठी यांनी झाडाच्या फांद्या तोडून पसरणारी आग आटोक्‍यात आणली. यात बऱ्याच वृक्षांची हानी झाली आहे.

The drunkards near Khalapur Cigarettes cause fire near petrol pump

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT