drunken car driver damage seven cars in Dombivli mumbai sakal
मुंबई

डोंबिवलीत मद्यधुंद कार चालकाने सात गाड्यांचा केला चक्काचूर

डोंबिवली पश्चिमेत एका मद्यधुंद कारचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून 5 दुचाकी व 2 रिक्षांचा चक्काचूर केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेत एका मद्यधुंद कारचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून 5 दुचाकी व 2 रिक्षांचा चक्काचूर केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. स्थानिकांनी कार चालकाला पकडून त्याला विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरु केला आहे. निळकंठ पटवर्धन (वय 46) असे कारचालकाचे नाव असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती दुचाकी व रिक्षा चालकाने दिली आहे. डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात गुरुवारी दुपारी एका चारचाकी चालकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.

रिक्षाचालक अनंत शेलार म्हणाले, कार चालक सुसाट वेगाने आला, माझी रिक्षा थांब्यावर भाड्यासाठी उभी होती. माझ्या रिक्षाला गाडीने धडक दिल्यानंतर समोरच्या दुसऱ्या रिक्षाला धडक दिली असे सांगितले. तर दुचाकीस्वार प्रशांत कांबळे म्हणाला, मी दुपारी घरीच होतो, जोराचा आवाज झाल्याने रस्त्यावर खाली धावत आलो आणि पाहिले तर रस्त्यावर दुचाकी अस्ताव्यस्त पडल्या होत्या. मारुती इको कंपनीच्या गाडीने दुचाकींना धडक दिली होती. त्या कारचालकाला नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कारचा वेग एवढा होता की 5 दुचाकी व 2 रिक्षांचे यात मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT