khopoli 
मुंबई

धो-धो पावसाने खोपोली जलमय, 'हे' कारण ठरतंय ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचं

सकाळवृत्तसेवा

खोपोली : बिल्डरांनी इमारती उभारताना पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. तसेच, अनेक नैसर्गिक पाणी प्रवाह बंद केले. याचा परिणाम रहिवासी भागांत पाणी तुंबण्यात होत आहे. शनिवारपासून पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे अक्षरशः खोपोली जलमय झाले आहे.

खोपोली शहरातील लौजी, डी. पी. रोड व उदयविहार परिसरातील सोसायट्यांमध्ये शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी शिरले. लौजी परिसरातील अनेक इमारतींमध्ये शेकडो रहिवासी राहत आहेत. तर अनेक टोलेजंग इमारतींचे आजही बांधकाम सुरू आहेत. भविष्यात येथील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पालिका प्रशासन आणि विकासकाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. याशिवाय कोरोना महामारी सर्वत्र पसरत असल्याने नालेसफाईही या वर्षी करण्यात आली नाही. यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लौजी येथील उदयविहार परिसरातील अनेक सखोल भागात व मोकळ्या जागेत पाणी तुंबले आहे. दरम्यान, सोमवारी स्थानिक नगरसेवक व नगरपालिका बांधकाम विभागाकडून जेसीबी लावून पाणी निचरा करण्यात आल्याने रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बिल्डरांनी इमारती उभ्या करताना नैसर्गिक प्रवाह बंद केले. काही ठिकाणी तर नाले बुजवण्यात आले आहेत. नगरपालिकेकडे या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या; मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- जयवंत माडपे, रहिवासी, लौजी 


ज्या भागात पाणी तुंबले, त्या ठिकाणी नगरपालिकेकडून तातडीने पाणी निचरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे मनुष्यबळाची उपलब्धता कमी होत असल्याने कामे होण्यात अडचणी आहेत; मात्र बांधकाम विभागाला  तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
- सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली

due to heavy rains the khopoli was flooded and the work of sanitation was not completed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT