वालीव फाटा येथील औद्योगिक वसाहतीत आढळलेला साप. 
मुंबई

भक्ष्याच्या शोधात साप घरा-दारात

सकाळ वृत्तसेवा

वसई ः अवेळी पाऊस, तापमानात वाढ, अशा वातावरणातील बदलामुळे डोंगराळ आणि निर्जन ठिकाणी असणारे साप आता वसईच्या औद्योगिक आणि मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत. यामुळे नागरिकांच्या डोक्‍याला ताप झाला असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बचावासाठी सर्पमित्र अथवा अग्निशमन दलाला पाचारण केले जात आहे. 

वसई पूर्व भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. वालीव फाटा, सातिवली, पेल्हार, भोईदापाडा, चिंचपाडा, वालीव, गोलानी या ठिकाणी विविध वस्तू तयार करणारे छोटे-मोठे कारखाने आहेत. तेथील गाळ्यांसह अडगळीच्या ठिकाणी साप लपून बसत आहेत, तर मालजी पाडा, चिंचोटी, नायगाव स्टार सिटी, वाकीपाडा, कामण, विरार, सोपारा फाटा यासह ग्रामीण व शहरी भागातील बैठी घरे, चाळी आणि गृहसंकुले आदी ठिकाणीदेखील भक्ष्याच्या शोधात ते येत आहेत.

घरात आणि कचऱ्याच्या ठिकाणी असणाऱ्या उंदराची शिकार साप करत आहेत. तापमानात झालेले बदल, पावसाची अवेळी हजेरी यामुळे हे साप बाहेर निघत आहेत. बऱ्याच जणांना सर्पदंशदेखील झाला असून उपचारासाठी वसई, कांदिवली, दहिसर या ठिकाणी जावे लागत आहे; मात्र महामार्गावर अशा घटना घडल्या, तर दंश झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे जवळच उपचारासाठी प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. 

घरी, कारखान्याचे गाळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साप येत आहेत. रोजच ३ ते ४ ठिकाणाहून नागरिक मदतीसाठी संपर्क करतात. तेथे जाऊन साप पकडून नंतर त्यांना जंगलात सोडून देतो. महिन्याभरात ६० हून अधिक साप पकडले आहेत. सापाला नागरिकांनी मारू नये, तर सर्पमित्र अथवा महापालिकेशी संपर्क साधावा. 
संकेत पाटील, सर्पमित्र, वाकीपाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT