संग्रहित छायाचित्र 
मुंबई

लॉकडाऊन ब्रेक : `मेट्रो 3` भुयारी मार्गाचे काम धीम्या गतीने 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमुळे "कुलाबा-वांद्रे-सीप्झ' मेट्रो 3 भूमिगत प्रकल्प स्थळी गर्दी होऊ नये यासाठी पाच टक्केच कामगार कार्यरत आहेत. त्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. 

"मेट्रो 3' प्रकल्पाच्या दोन बोगद्यांचे खोदकाम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे ( एमएमआरसी ) यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. "कृष्णा 3' टीबीएम मशीनने पॅकेज 4 मधील सिद्धिविनायक मंदिर ते वरळी स्थानक हे 1.28 किमी अंतर खोदून पूर्ण केले गेले. गोदावरी 3 या टीबीएम मशीनने बहुचर्चित असा मिठी नदीखालील पहिला बोगदा 278 दिवसांत खोदून पूर्ण केला. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अडचण निर्माण झाली आहे. सरकारच्या नियमानुसार किमान 5 टक्के कर्मचारी वर्ग मेट्रो 3 प्रकल्प स्थळी काम करत आहे. परिणामी मेट्रोच्या भूमिगत प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. 

हे वाचलं का? : व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाचा विद्यार्थिनींना दिलासा

अत्यावश्‍यक व अनिवार्य कामेच सध्या करण्यात येत आहेत. नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अभियंते, कर्मचारी कटिबद्ध आहेत, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन तर्फे स्पष्ट करण्यात आले.

महत्त्वाचे ः कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार एक महिन्याचा जादा पगार

मिठी नदीखालील दुसरा बोगदा रखडला 
मेट्रो 3 च्या 33.5 किमीच्या भूमिगत मार्गातील पूर्ण झालेला हा 27 वा बोगदा आहे. या मार्गात एकूण 32 बोगदे असणार आहेत. जमिनीवर नदीचा प्रवाह असल्याने भूस्तराचा पोत ओळखून त्याप्रमाणे खोदकाम करणे जिकिरीचे होते. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा आणि दाबाचा विचार करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मिठी नदीखाली सुमारे 12.5 मीटर खोलीवर बोगद्याचे खोदकाम करण्यात आले आहे. या नदीखालील दुसऱ्या बोगद्याचे काम मार्चअखेरीस पूर्ण होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते काम रखडले आहे. या मार्गावरील आतापर्यंत 7.97 किलोमीटरचे कामे पूर्ण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT