मुंबई

लाॅकडाऊनमुळे फेरी बोटसेवेचे उत्पन्नच बंद; अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड

निसार अली : सकाळ वृत्तसेवा



मालाड : कोरोना संकटामुळे फेरी बोटसेवा पुरवणाऱ्यांचा व्यवसाय पुर्ण ठप्प पडला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. तसेच, यामुळे मच्छिविक्रेत्या महिलांनाही इतरत्र मासे विकण्यासाठी जाता येत नसल्याने त्यांच्यासमोरही आर्थिक संकट निर्माण झाले आहे. लाॅकडाऊनमुळे फेरी बोट सेवा पुरवणाऱ्या सहकारी संस्थांची दैनंदिन कमाई 40 ते 45 हजारांवरून थेट दोन हजारांवर आली आहे.  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आले. तेव्हापासून मनोरी-मार्वे व गोराई-बोरीवली फेरी बोटसेवा प्रवासी व पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. सहकारी तत्त्वावर या दोन्ही  बोट सेवेचे मच्छिमार सहकारी संस्था संचालन करतात; मात्र लाॅकडाऊनमुळे दोन्ही संस्थांचे उत्पन्नच जवळपास बंद झाल आहे. सध्या फक्त आरोग्य कर्मचारी, पोलिस, पालिका कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बोट चालवली जात आहे. त्यातून नाममात्र उत्पन्न मिळत असल्याचे संस्थांचे म्हण्णे आहे. तसेच, ईधंन खर्च, कर्मचारी व इतर स्टाफचा मासिक पगार, बोटीच्या देखभालीचा खर्च यामुळे हातात काहीच उत्पन्न राहत नाही. तरीही आम्ही बोट सेवा बंद केली नसून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी व रुग्णांसाठी फेरी बोट चालवत असल्याचे संस्थांनी सांगितले आहे. 

मच्छिविक्रेत्या महिलांनाही फटका
फेरी बोट बंद असल्याने गोराई गावातील मासेविक्रेत्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यापासुन गावातील जवळपास 250 मासेविक्रेत्या महिलांना मासे विकण्यासाठी बोरीवलीला जाता आले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

50 टक्के कर्मचारी कपात
मनोरी-मार्वे फेरी बोट संस्थेकडे सध्या 34 कर्मचारी व प्रशासनिक स्टाफ आहे.  संस्थकडून कर्मचाऱ्यांना 50 टक्के पगार व शिधा दिले जात आहे. तसेच गोराई-बोरीवली फेरी बोट संस्थेकडे 40 कर्मचारी व स्टाफ आहेत. त्यातील 50 टक्के लोकांना कामातून कमी करण्यात आले आहे. दोन्ही संस्थांची दैनंदिन कमाई  40 ते 45 हजारावरून आता दोन हजारांवर आली आहे. 


कोरोनाचा फटका आमच्या संस्थेलाही बसला; मात्र मेरी टाइम बोर्ड आणि त्यांचे अधिकारी आम्हाला सहकार्य करत आहेत. मोठे आर्थिक नुकसान सहन करीत आम्ही आमचे कर्तव्य समजून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सेवा अविरत सुरु ठेवली आहे. सरकारने काही निर्बंध घालून व्यावसायिक आणि मासे विकणाऱ्या महिलांना परवानगी दिल्यास मोठी मदत होईल. 
- जोसेफ कोलासो, अध्यक्ष, गोराई मच्छीमार सहकारी संस्था


फेरी बोट सेवा पुरवण्यासाठी रोज जवळपास 35 हजारांचा खर्च येतो; मात्र आता उत्पन्नच जेमतेम  दोन-अडीच हजार होत असल्याने मोठा आर्थिक नुकसान होत आहे. लाॅकडाऊनमुळे संस्था चालवणेही कठिण होत आहे. 
- राॅकी कोळी, अध्यक्ष, मनोरी ग्रामस्थ मंडळ

------------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT