rain update sakal
मुंबई

ढगांच्या गडगडाटासह पाऊस, कर्जत, कसारा, कल्याण मार्गावर लोकल सुरु

पावसामुळे आधीत ठाणे-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: मुंबईसह (Mumbai rain) ठाणे, अंबरनाथ, उरण, कर्जत, पनवेल (panvel) नवी मुंबई या पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. काल संध्याकाळी सुद्धा ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला होता. आजही तशाच पद्धतीने पाऊस सुरु आहे.

पावसामुळे आधीच ठाणे-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. आता मध्य रेल्वे मार्ग पावसामुळे बाधित होण्याची शक्यता आहे. कर्जत ते कल्याण आणि कसारा ते कल्याण मार्गावर काही ठिकाणी ओव्हर हेड वायर मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. कर्जत कल्याण आणि कसारा कल्याण मार्ग ०६:४० ते ०७:१५ वाजेपर्यंत बाधित झाले होते. आता ट्रेन पुन्हा या मार्गावर सुरू झाल्या आहेत.

या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. अजूनपर्यंत तरी पावसामुळे कुठे पाणी साचल्याचे वृत्त नाहीय. एक-दोन तासाच्या मुसळधार पावसाने मुंबापुरीची तुंबापुरी होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. पाणी साचल्यास रस्ते वाहतूक कोलमडून पडते. मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाल्यास कामावरुन घरी परतणाऱ्यांचे हाल होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT