Balasaheb Thackeray 
मुंबई

Dasara Melava: बीकेसीत अवतरले 'बाळासाहेब'; फोटो काढण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी

बीकेसीवर आज शिवेसेनच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बीकेसीमध्ये एकनाथ शिंदे यांचा मेळावा थोड्याच वेळात पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. यामध्ये एक प्रती बाळासाहेब ठाकरे देखील दिसून आले आहेत. हुबेहूब बाळासाहेब ठाकरेंचा वेश करुन ते या मेळाव्यासाठी आल्यानं खास आकर्षण ठरले आहेत. विशेष म्हणजे या प्रती बाळासाहेब ठाकरेंसोबत फोटो काढण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गर्दी झाली आहे. (Dummy Balasaheb Thackeray reached in BKC for Eknath Shinde Dasara Melava)

सत्तर वर्षीय भगवान शेवडे असं या प्रति बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे. शिंदेंच्या मेळाव्याला आलेल्या या प्रति बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या भावनाही व्यक्त केल्यe, यावेळी ते भावूकही झाले. शेवडे हे साताऱ्याचे रहिवासी असून अनेक वर्षांपासून शिवेसनेचे सदस्य आहेत. त्यांना साताऱ्यात प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखतात. तसेच शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.

काही काळापूर्वी एकनाथ शिंदे कामानिमित्त साताऱ्याला आले होते, त्यावेळी त्यांनी साताऱ्यातील शिवसेना कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी मी खुर्चीत बसलो होतो, पण मला उठता येईना आणि चालता येईना म्हणून मी खुर्चीतच बसून होतो. माझ्याकडं बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर त्यांनी मला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यांना वाटलं की मी बाळासाहेबांना बघतोय, अशा शब्दांत शेवडे यांनी एकनाथ शिंदेंसोबतची आठवणही यावेळी शेअर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT