Neelam Gorhe News  sakal
मुंबई

Nilam Gorhe: आझाद मैदानावरील दसरा मेळावा स्फूर्ती देणारा - निलम गोऱ्हे

सकाळ डिजिटल टीम

Nilam Gorhe: आझाद मैदानावर मेळावा हा लोकांना विकास होण्याच्या दृष्टीने स्फूर्ती देणारा कार्यक्रम असेल, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे गोऱ्हे यांनी शनिवारी दर्शन घेतले, त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते मीना कांबळी, आमदार मनीषा कायंदे, माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव आदी उपस्थितीत होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी २२ विविध योजना जाहीर केल्या. या योजना केवळ जाहीर न करता, त्याची अंमलबजवानी करणारी सरकारी यंत्रणा सरकारच्या बरोबरीने उभी करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्धार आहे.

माझ्या मते जिथे महिलांना धोका वाटतो तिथे वेळ पडल्यास महिलांना शस्त्राचे परवाने द्या, अशी भूमिका मी विधिमंडळात मांडली असल्याचे त्या म्हणाल्या. संजय राऊत आरोप करतात की, आमचा पक्ष अमली पदार्थाच्या बाजूने आहे का? पण माझा त्यांना सवाल आहे, की तुमच्याच पक्षातील तो ललित पाटील उबाठातून कधी बाहेर पडला? त्याच्यावर कधी कारवाई केली? तो तुमच्याच पक्षात आहे. त्याने कधी राजीनामा दिला? तो अटकेत आहे.

पण तुम्ही आम्हालाच उलटे प्रश्न करतात. असे खडे बोल त्यांनी सुनावले. नाना पटोले यांच्याबाबत विचारले असता, पटोले यांनी आधी हे स्पष्ट करावे की, त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? त्याचा पुढील राजकारणावर काय परिणाम झाला, हे सर्वांनी पाहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT