Dussehra Melava sakal
मुंबई

Dussehra Melava : ढोल-ताशांच्या गजरात : कल्याण-डोंबिवलीतून शिवसैनिक शिवतीर्थाच्या दिशेने

ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके वाजवत कल्याण शहरातुन हजारो आणि डोंबिवली शहरातून हजारांच्यावर शिवसैनिक दादरच्या शिवतीर्थवर

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण आणि डोंबिवलीतुन मोठ्या संख्येने शिवसैनिक नाचत गाजत मुंबईचे दिशेने रवाना झाले आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके वाजवत कल्याण शहरातुन हजारो आणि डोंबिवली शहरातून हजारांच्यावर शिवसैनिक दादरच्या शिवतीर्थवर पक्षप्रमुख उध्दव ठकरें यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी रवाना झाले. कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, उप जिल्हा प्रमुख किशोर मानकामे, शहर प्रमुख विवेक खामकर, तात्या माने, कविता गावंड आदी पदाधिकारी उपस्थित आहेत.

शिवसेनेचा हा इतिहास दसरा मेळावा हा गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात स्व. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने शिवसैनिक जमा होत होते. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्वव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठीहि गर्दी होते. शिवाजीपार्क येथील होणाऱ्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक नेता, एक झेंडा, एक मैदान...एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा! ही घोषणा केल्याने निष्ठावंत शिवसैनिकांची ऊर्जा अजून वाढली आहे.

त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी डोंबिवली परिसरातून सुमारे 2 हजार शिवसैनिक गेले आहेत. विशेष म्हणजे खाजगी वाहनांनी न जाता सर्व शिवसैनिक रेल्वेतून रीतसर तिकीट काढून जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's Asia Cup Rising Stars : भारतीय महिलांनी जिंकला आशिया चषक; महाराष्ट्राची पोरगी चमकली, बांगलादेशला मात दिली

Budget Session: अधिवेशन सुरू होण्याआधीच रणसंग्राम! बहिष्कार, सरकारला 6 गंभीर मुद्द्यांवर घेरण्याची तयारी, काय आहे विरोधकांचा प्लॅन?

Nashik Municipal Corporation : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! नाशिककरांनाही खरेदी करता येणार महापालिकेचे 'हरित कर्जरोखे'

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, मंत्री झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी

Ozar Bus Stand : ओझर बसस्थानकात अखेर पाच वर्षांनंतर लालपरीची ‘घरवापसी’! आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन झुकले

SCROLL FOR NEXT