Shakti Act esakal
मुंबई

मुंबई : अत्याचार प्रकरणात आरोपींना लवकर शिक्षा

‘शक्ती’ला बळकटी देणारे विधेयक मंजूर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या शक्ती विधेयक सक्षमतेने वापरण्यासाठी यंत्रणा उभी करता यासाठी एका महत्त्वाच्या दुरुस्ती विधेयकाला गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. यातील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असून महिला अत्याचारातील प्रकरणातील अपराधाचे गांभीर्य ओळखून त्याचा तपास विशेष पथकाकडे दिला जाणार आहे.

‘महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, २०२०’ (२०२० चे विधेयक क्र. ५२) असे या विधेयकाचे नाव होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. ते म्हणाले की, राज्यातील महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतून राज्य सरकारने विधेयक क्र. ५१ - शक्ती विधेयक याधीच मंजूर केले होते. परंतु त्या विधेयकला सुविधा देण्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करायला हवी होती. त्यासाठी २०२० चे विधेयक क्र. ५२ हे विधेयक आणण्यात आले आहे. याआधी १४ डिसेंबर २०२० रोजी हे विधेयक सभागृहात मांडले होते. दोन्ही बाजूच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक चर्चेसाठी पाठविले. समितीने एकमताने केलेला अहवाल मंजूर करण्यात आला.

विशेष न्यायालयाची स्थापना

‘‘या विधेयकाद्वारे विशेष न्यायालय स्थापन होणार आहे. प्रसंगानुसार उपलब्ध न्यायालयांना देखील हा दर्जा देण्यात येईल. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात गुन्हेगारांना योग्य शिक्षा करणे अत्यंत आवश्यक असल्याने विशेष सरकारी वकील बदलण्याची व त्याऐवजी विशेष सरकारी वकील नेमण्याची खंड ७ मध्ये तरतूद केली आहे. खंड ८ मध्ये विनिर्दिष्ट अपराधांचा तपास करण्यासाठी विशेष पोलिस पथक स्थापन करण्याची तरतूद यात आहे. पोलिस अधिक्षक, पोलिस अधिकारी यांना अपराधाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर अपराधाचे अन्वेषण विशेष पथकाकडे सोपविण्याचे अधिकार असतील,’’ असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT