file photo 
मुंबई

ड्रोन घेणार आगीचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलात रोबो दाखल झाल्यानंतर आता लवकरच ड्रोनचाही वापर केला जाण्याची शक्‍यता आहे. उंच इमारतींना लागलेली आग विझवण्याबरोबरच आगीचा अंदाज घेण्यासाठीही ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे अग्निशमन दलाची कार्यक्षमता व अचूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई अग्निशमन दलाने काही महिन्यांपूर्वी आग विझवणारा रोबो ताफ्यात दाखल केला आहे. त्याचबरोबर आता ड्रोनही विकत घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नुकत्याचा झालेल्या महासभेत देण्यात आली.

प्रत्यक्ष आग विझवण्यासाठी ड्रोनचा कितपत वापर होईल याबाबत साशंकता आहे. तरीही ड्रोनद्वारे टेहळणी करून उपाययोजना करता येईल. आगीचा अंदाज न आल्याने अनेक वेळा अपघात घडले आहेत. अशा वेळी ड्रोनच्या साह्याने पाहणी करून मदत पोहचवली जाऊ शकते, असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

पाच वर्षांपूर्वी अंधेरीतील लोटस बिझनेस पार्क या बहुमजली इमारतीची आग आटोक्‍यात आणताना अग्निशमन जवानाचा मृत्यू झाला होता. त्या इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. अशा परिस्थितीत ड्रोनच्या साह्याने आगीचा अंदाज घेता येऊ शकतो. 

परदेशात रासायनिक आगीच्या वेळी वापर
परदेशात ड्रोनचा वापर आग आटोक्‍यात आणण्यासाठीही केला जातो. ड्रोनला पाण्याचा पाईप जोडून उंचावरील आगही आटोक्‍यात आणली जाते. खासकरून रासायनिक आगीच्या वेळी ड्रोनचा वापर केला जातो. मात्र, मुंबईत रेकी करण्यासाठी वापर करण्याचा अग्निशमन दलाचा विचार आहे.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT