मुंबई

खा फुकट... चिकन बिर्याणी, लॉलीपॉप; खवय्यांसाठी खास महोत्सव

राजेश कांबळे

पेण  : चिकन बिर्याणी, लॉलीपॉप ही नावे ऐकली तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातही हे स्वादिष्ट पदार्थ मोफत खाण्यास मिळाले तर मोठी पर्वणीच. चिकन महोत्सवाच्या निमित्ताने या पर्वणीचा शुक्रवारी (ता.21) लाभ घेता येणार आहे. 

बर्ड फ्लूच्या भीतीने अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. परंतु व्यवस्थित शिजवलेले चिकनचे पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही बर्ड फ्लूचा संसर्ग होत नाही, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पेण येथे रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्था मर्यादितच्या वतीने पेण पालिकेच्या मैदानावर "चिकन महोत्सव' भरवण्यात आला आहे. सायंकाळी 7 ते 9 दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात चिकन लॉलीपॉप, चिकन लेगपीस, चिकन बिर्याणी आणि अंड्यांच्या पदार्थांचा मोफत आस्वाद देण्यात येणार आहे. 

महोत्सवाला खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार जयंत पाटील, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, नगराध्यक्षा प्रितम पाटील,उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रायगड शेतकरी योध्दा कुक्कूटपालन सहकारी संस्थाचे अध्यक्ष अनिल खामकर, उपाध्यक्ष विलास साळवी, खजिनदार मनोज दासगावकर आणि सचिव दीपक पाटील यांनी दिली. 
----------------------------------------------

( संपादन  -  तुषार सोनवणे )

eat Chicken biryani lollipop in pen Special festival for foodies

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable T20I Squad for SL Series: संजू सॅमसन OUT, अभिषेक शर्मा- वैभव सूर्यवंशी नवीन ओपनिंग जोडी? श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताच्या संघात उलथापालथ

साप्ताहिक राशिभविष्य : (२९ नोव्हेंबर २०२६ ते ५ डिसेंबर २०२६)

SMASHED MASALA PANEER ROTI TACOS RECIPE: बाजारातले टॅको विसरा! उरलेल्या पोळीपासून घरीच बनवा चमचमीत पनीर टॅको; रविवारचा ब्रंच होईल हटके!

IND vs NZ 2nd Test Live: ध्रुव जुरेल नडला, भारताने Follow-On टाळला! आकाश, गुरनूरला सोबत घेत न्यूझीलंडला रडवले; तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पलटवार

India Probable ODI Squad for Sri Lanka Series: मोहम्मद सिराज बाकावरच, जसप्रीत बुमराहला विश्रांती? श्रीलंकाविरुद्ध कशी असेल भारताची वन डे टीम? लवकरच घोषणा

SCROLL FOR NEXT