मुंबई

वेळेसोबत लाकडांचीही बचत; मुंबईत आता पर्यावरणपूरक शवदाहिनी 

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनासंकटात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने शवांचे दहन करण्यासाठी नवीन प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील स्माशानभूमीमध्ये पालिकेने पर्यावरणपूरक शवदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यातील पहिली शवदाहिनी सायन हिंदू स्मशानभूमीत बसवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या नवीन शवदाहिनीमुळे धार्मिक विधींसह कमी वेळेत तसेच कमी लाकडांचा वापर करून अंत्यसंस्कार करता येणार आहेत. 

यापूर्वी एका स्थायी ट्रॉलीवर शव ठेवले जात होते. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जात. आता मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत चाके असणारी ट्रॉली बनवण्यात आली आहे. त्यावर शव ठेवून धार्मिक विधी पूर्ण करता येणार आहेत. शिवाय नातेवाईकांना मुखाग्नी देणेसुद्धा शक्‍य होणार आहे.

पारंपरिक प्रकारे शव संपूर्णतः जळण्यासाठी 4 तासांचा अवधी लागत होता; मात्र या नव्या प्रणालीमुळे शव केवळ दीड तासात जळणार आहे. इलेक्‍ट्रॉनिक किंवा पीएनजी प्रकारात नागरिकांना परंपरा किंवा धार्मिक विधी करणे शक्‍य होत नव्हते. पर्यावरणपूरक शवदाहिनीत लाकडांची बचतदेखील मोठ्या प्रमाणावर होणार असून कार्बनडायॉक्‍साईडचे उत्सर्जनदेखील कमी प्रमाणात होते. त्यामुळे वायू तसेच जलप्रदूषणदेखील कमी होते. सायन स्मशानभूमीत ही नवीन शवदाहिनी बसवण्यात आली आहे. या शवदाहिनींची रचना वेगळ्या प्रकारे करण्यात आल्याने कमीत कमी लाकडांचा वापर करणे शक्‍य झाले आहे.

याबाबत पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, साधारणपणे एका शवाच्या अंत्यसंस्कारासाठी 300 ते 400 किलो लाकडांचा वापर केला जातो. मात्र या नव्या शवदाहिनीमध्ये वेगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक रचनेमुळे केवळ 100 ते 200 किलो लाकडे लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे अंत्यसंस्कारावेळी मृतांच्या नातेवाईकांना धार्मिक विधीदेखील करता येणार असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. 

नेपाळच्या मॉडेलचे अनुकरण 
नेपाळमध्ये या पर्यावरणपूरक शवदाहिनीचा वापर केला जातो. "एमएस ऊर्जा गॅसीफायर' या कंपनीने ही प्रणाली विकसित केली असून नेपाळमधील अनेक स्मशानभूमीमध्ये या प्रणालीचा वापर केला जातो. या कंपनीने मुंबई पालिकेला ही प्रणाली जाणून घेण्यासाठी नेपाळमध्ये आमंत्रित केले होते. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नेपाळमध्ये जाऊन या प्रणालीची माहिती घेतली. त्यांतर ही प्रणाली मुंबईत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असून सध्या तीन स्मशानभूमींमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. 
--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT