file photo 
मुंबई

कपिल वाधवाला `मिर्ची` प्रकरण झोंबले!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचा (डीएचएफएल) मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवा याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी अटक केली. दाऊद इब्राहीमचा हस्तक इक्‍बाल मिर्ची याच्या बेकायदा मालमत्तेप्रकरणी ही अटक करण्यात आली. न्यायालयाने वाधवान याला 29 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : रुग्णालयात नेण्यास दिरंगाई भोवली, दोघांना तुरुंगवास
 
इक्‍बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांच्या मुंबईत पाच मालमत्ता असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील दोन मालमत्ता मेसर्स सनब्लिंक रिऍल्टर्स व मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. यांना विकण्यात आल्या आहेत. वरळीतील मालमत्ता 2011 मध्ये सनब्लिंक रिऍल्टर्सला विकण्यात आली होती. या व्यवहारात कपिल वाधवाने मनी लॉण्डरिंगसाठी आरोपीला मदत केल्याचा संशय असून ईडी अधिक तपास करत आहे. 

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस दुर्दैवी गृहमंत्री; वाचा कोणी म्हणलं...

सिजय हाऊस ही 15 मजल्यांची इमारत मिर्ची व मिलेनियम डेव्हलपर्स यांनी 2007 मध्ये बांधली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील 14 हजार चौरस फुटांची मालमत्ता 2007 मध्ये मिर्चीच्या कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आली. त्याशिवाय खंडाळ्यात सहा एकर जमीन मेसर्स व्हाईट वॉटर लि. यांच्या नावावर आहे. त्याचा ताबा मिर्चीच्या दोन मुलांकडे आहे. मुंबईतील साहिल बंगला मिर्चीची पत्नी व मुलाच्या नावावर आहे. वरळीतील समंदर महल येथील मालमत्ता मिर्चीची बहीण व मेहुण्याच्या ताब्यात आहे.

भायखळा येथील रोशन हाऊस चित्रपटगृह, क्रॉफर्ड मार्केट येथे तीन दुकाने, जुहू तारा रोड येथे मिनाज हॉटेल व पाचगणी येथील बंगला अशा इक्‍बाल मिर्चीच्या मालमत्तांची माहिती ईडीला मिळाली आहे. मुंबईतील या सर्व मालमत्तांची किंमत तब्बल 500 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: बंगळुरू-गुजरात Qualifier-1 मध्ये फायनलसाठी भिडणार! पण कुठे आणि कधी होणार सामना? सर्व डिटेल्स घ्या जाणून

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! 'या' मार्गावर १० दिवस ब्लॉक, लोकलच्या वेळापत्रकात बदल; वाचा सविस्तर

Mumbai Crime: जागेच्या वादातून प्रवाशाला मारहाण, दहा लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास; २५ दिवसांनी तक्रार

एक बिहारी, भल्याभल्यांवर भारी! रोहित, विराट धोनी नाही; IPL 2026 मध्ये बिहारच्या ३ पोरांनीच कशी मारली बाजी?

Marathi Live News update: नवी मुंबईत २५ मे पासून १० टक्के पाणी कपात लागू

SCROLL FOR NEXT