Anil Deshmukh File photo
मुंबई

मोठी बातमी - अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटक

मध्यरात्री केली अटकेची कारवाई

दीनानाथ परब

मुंबई - ईडीने शनिवारी मध्यरात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. देशमुखांवर लाच घेतल्याचे आरोप झाले असून त्या प्रकरणात झालेली ही पहिली अटक आहे. ईडीने काल देशमुख यांच्या नागपूर GPO चौक येथील घरावर छापा मारला. त्यावेळी घरात देशमुख यांचा मुलगा सलिल होता. ईडीने त्यांचीही काही तास कसून चौकशी केली. (ED arrests Maharashtra ex minister anil deshmukh two aides) (सविस्तर वृत्त लवकरच)

बर्खास्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने बार मालकांकडून ४ कोटी रुपये गोळा केला व ते सर्व पैसे देशमुख यांच्याकडे दिले, असा ईडीचा आरोप आहे. "हा सर्व पैसा शेल कंपन्यांमध्ये गुंतवून नंतर देशमुख कुटुंबाशी संबंधित कंपन्यांकडे वळवण्यात आला" असे सूत्रांनी सांगितले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी काल ईडीकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्याचवेळी देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडीकडून कसून चौकशी सुरु होती. एका चार कोटी रुपयांच्या प्रकरणात ही छापेमारीची (ed raid) कारवाई झाली होती. मुंबईतील १० बार मालकांनी (bar owners) अनिल देशमुख यांना तीन महिने चार कोटी रुपये दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे.

अनिल देशमुखांविरोधात आर्थिक अफरातफरीचे प्रकरण ईडीने नोंदवले आहे. या प्रकरणात मिळालेल्या नव्या माहितीच्या आधारावर ईडीने देशमुखांच्या नागपूर, मुंबईसह चार ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. मुंबईमध्ये ईडीचे पथक अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या निवासस्थानी सुद्धा शोध घेतला होता . बार मालकांनी देशमुखांना रोख रक्कम दिली. ते पुरावे ईडीने मिळवले असून त्या आधारावर ही कारवाई सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT