Tina Ambani sakal
मुंबई

Tina Ambani : फेमा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी टीना अंबानींची ईडीकडून चौकशी

परकीय चलन कायद्याच्या फेमाच्या कथित उल्लंघनाप्रकरणी अभिनेत्री आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानीची मंगळवारी ईडीने चौकशी केलं.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - परकीय चलन कायद्याच्या फेमाच्या कथित उल्लंघनाप्रकरणी अभिनेत्री आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानीची मंगळवारी ईडीने चौकशी केलं. मंगळवारी टीना अंबानी सकाळी 11 च्या सुमारास चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्या.

यापूर्वी सोमवारी याच प्रकरणात अनिल अंबानी यांचाही ईडीकडून जबाब नोंदवण्यात आला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ईडी अंबानीं दांपत्याना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावू शकते. यापूर्वी 2020 साली येस बँक प्रकरणात ईडीने अनिल अंबानींची चौकशी केली होती.

अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी ईडीसमोर हजर झालेल्या प्रकरणाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. परंतु सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार अंबानी दाम्पत्याविरुद्धचा तपास परदेशात अघोषित संपत्ती आणि पैशांच्या व्यवहाराशी संबंधित आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, आयकर विभागाने अनिल अंबानी यांना काळा पैसा विरोधी कायद्यांतर्गत दोन स्विस बँक खात्यांमध्ये जमा केलेल्या 814 कोटी रुपयांच्या अज्ञात रकमेवर 420 कोटी रुपयांची करचोरी केल्याबद्दल नोटीस बजावली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अंबानी याना दिलासा देत त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाला दिले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी हे रिलायन्स एडीए ग्रुपचे (रिलायन्स एडीएजी) चेअरमन आहेत. सध्या अनिल अंबानी व्यवसायात अनेक अडचणीना सामना करत आहेत. अनिल अंबानींच्या अनेक कंपन्यांवर प्रचंड कर्ज असून ते दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT