ED Officer Rana Banerjee deleted his facebook account who enquirers Raj Thackeray 
मुंबई

राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने आपले फेसबुक अकाऊंट केले डिलीट

योगेश कुटे

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ईडीचे (सक्तवसुली संचालनालय) सहायक संचालक राणा बॅनर्जी यांनी तब्बल साडेआठ तास चौकशी केली. बॅनर्जी यांच्याच स्वाक्षरीने ठाकरे यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. राज यांना पुन्हा गरज पडल्यास चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

मुंबईतील अनेक हायप्रोफाईल केसचा तपास ईडीकडे आहे. आयएल अॅंड एफएस, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा गाजलेल्या तपासासह कोहिनूर मिल प्रकरणातील मनी लाॅंडगिंरचा (पैसा सफेद करणे) तपास मुंबईतील अधिकारी करीत आहेत. सहायक संचालक म्हणून नियुक्त असलेल्या बॅनर्जी यांनीच उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांना बारा तासांहून अधिक काळ चौकशी करत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला होता. मूळचे कस्टम खात्यातील असलेले प्रतिनियुक्तीवर ईडीत आहेत.

बॅनर्जी यांचे नाव राज यांच्या नोटिशीत आल्यानंतर त्यांच्याविषयी अनेकांनी सोशल मिडियात जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांचे फेसबुक अकाऊंट सकाळपर्य़ंत दिसून येत होते. त्यावर ईडीतील अनेक अधिकारी मित्र असल्याचे दिसत होते. तसेच बॅनर्जी यांचा राजकीय कलही शोधण्याचा प्रयत्न त्यातून अनेकांनी केला. बॅनर्जी यांनी लाइक केलेल्या पेजेसमध्ये अमित शहा यांचेही पेज असल्याचा स्क्रिन शाॅट सोशल मिडियात फिरला. त्यावरून काहींनी त्यांचा थेट भाजपशी संबंध असल्याचे जोडत टिप्पण्या केल्या. काही वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या फोटोसह बॅनर्जी यांची बातमी दिली. काही कालावधीनंतर बॅनर्जी यांचे फेसबुक अकाऊंट डिलीट झाल्याचे लक्षात आले. दुपारपर्य़ंत दिसणारे बॅनर्जी यांचे अकौंट दिसणे नंतर बंद झाले.

आर्थिक गुन्ह्यांचा तपास बराच किचकट असतो. त्यामुळे बराच संयम ठेवून तपास करावा लागतो. त्यात राजकीय नेते असतील तर त्यांना बोलते करण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापराव्या लागतात. बॅनर्जी यांनी राज यांच्याकडून काय आणि कशी माहिती घेतली, याची उत्सुकता आगामी काळात राहील. त्यांनी राज यांना तब्बल 35 प्रश्न विचारल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT