ed raid two places linked to sanjay raut case ed raids at different locations in mumbai rak94 Sakal
मुंबई

राऊतांच्या अडचणी वाढणार? ईडीची मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत आणि त्यांची याठिकाणी कसून चौकशी केली जात आहे. यादरम्यान आज पुन्हा ईडीकडून मुंबईतील त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

राऊतांच्या साथीदारांशी संबंधित असलेल्या ठिकाणी हे दोन्ही छापे टाकण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास यंत्रणेने गोरेगाव आणि सांताक्रूझ येथील दोन ठिकाणी छापे टाकले. रविवारी मध्यरात्री ईडीने संजय राऊत यांना मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली, त्यांच्या घरी नऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरातून 11.5 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते.

पत्रा चाळच्या पुनर्विकासातील कथित आर्थिक अनियमितता आणि त्याची पत्नी आणि कथित सहकारी यांच्याशी संबंधित आर्थिक मालमत्ता व्यवहारांशी संबंधित ईडीकडून चौकशी केली जात आहे. एप्रिलमध्ये, ईडीने या तपासाचा भाग म्हणून त्यांची पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या दोन साथीदारांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केलीय.

दरम्यान रवीवारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर 16 तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली. नंतर काल संजय राऊत यांना ईडीच्या कोर्टात हजर केलं यावेळी त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली. एकीकडे राऊतांची कोठडीत चौकशी सुरू असतानाच राऊत यांच्या संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तसेच राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्याशी संबंधितांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे. यासंबंंधीत लोकांची पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT