Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
मुंबई

मोठी बातमी! ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी दाखल; अटक होणार?

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. राऊतांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. तसेच सीआय एस चे तीन तीन कर्मचारी संजय राऊत यांच्या घराबाहेर गेट वरती आहेत. संजय राऊत आपल्या परिवारासह घरातच असल्याची माहिती आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. आता आज केवळ चौकशी होणार की ईडीकडून त्यांना अटक होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.

संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या मैत्री या निवासस्थानी ईडीचं पथक दाखल झालं आहे. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्यानं ईडीचं पथक आता त्यांच्या घरी दाखल झालं आहे.

दरम्यान, संजय राऊतांची एक कथित ऑडिओ क्लिपही समोर आली होती. मात्र या क्लिपसंदर्भातली सत्यता अद्याप समोर आलेली नाही. या क्लिपमध्ये एका महिलेला अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केली जात आहे. ही ऑडिओ क्लिप संजय राऊतांची असल्याचं सांगत भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT