मुंबई

मोठी बातमी: विदर्भ सिंचन गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : विदर्भ सिंचन विकास महामंडळांतर्गत (व्हीआयडीसी) सिंचन प्रकल्पांची निविदा व कार्यादेश देण्याच्या पद्धतीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) तपास सुरु केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकताच गुन्हा दाखल केला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यांचा आधार घेऊन ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे.

26 नोव्हेंबर 2018 नंतर एसआयटीतील तपास अधिकाऱ्यांनी विविध विभागांशी पुन्हा पत्रव्यवहार करून तपासादरम्यान उपस्थित होणाऱ्या मुद्दयांची माहिती मिळवली. नागपूर एसआयटीने आतापर्यंत 102 निविदा आणि अमरावती एसआयटीने 57 निविदांची चौकशी केली. त्यापैकी फौजदारी गैरव्यवहार झाल्याचे समजल्यानंतर 24 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यात नागपूर विभागातील 20 आणि अमरावतीमधील 4 प्रकरणांचा समावेश आहे. दोन्ही विभागांमधील प्रत्येकी 7 अशा एकूण 14 प्रकरणांमध्ये पुन्हा गुन्हे दाखल करण्यासाठी जलसंपदा विभागाला पूर्वपरवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 45 निविदांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा गैरव्यवहार आढळून न आल्याने त्यांचा तपास बंद करण्यात आला आहे.
7 मे 2019 आणि 11 जून 2019 ला जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार प्रक्रिया व तांत्रिक मुद्दयांची माहिती मिळाली. 16 सप्टेंबर 2019 आणि 3 डिसेंबर 2019 ला अजित पवार यांनी चौकशी अधिकाऱ्यांना लेखी उत्तर सादर केले. अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.

तपास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल एसआयटीचे प्रमुख असलेल्या अमरावती व नागपूर एसीबी अधीक्षकांना सादर केले. या प्रकरणी अजित पवारांना नुकतीच क्लीन चिट मिळाली होती, तरी एसीबीने या प्रकरणी सुरूवातीला दाखल केलेल्या गुन्ह्यांतील सर्व आरोपींचा समावेश ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

Latest Marathi News Live Update : चर्नीरोड पुलासाठी भाजप आक्रमक, सैफी हाॅस्पिटल समोर आंदोलनास सुरवातल घरी विश्रांती घेणार

T20 World Cup : कदाचित नवा चेंडू टाकेन; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत वरुण चक्रवर्तीचे भाष्य

भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगेत आढळलं पिस्तुल, कुणी आणि कशासाठी आणलं?

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे नंतर कोणते 'डे' येतात? कसा साजरा केला जातो, जाणून घ्या लिस्ट

SCROLL FOR NEXT