ED summons again to former mayor Kishori Pednekar in case of Covid body bag scam esakal
मुंबई

Kishori Pednekar : कोविड बॉडी बॅग घोटाळा माजी महापौर किशोरी पेडणेकर याना पुन्हा ईडीचे समन्स

किशोरी पेडणेकर यांना कोविड रुग्ण बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : किशोरी पेडणेकर यांना कोविड रुग्ण बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे. ईडी ने यापूर्वीदेखील पेडणेकर यांना समन्स बजावलं होतं. मात्र, त्या ईडीसमोर हजर झाल्या नव्हत्या.

किशोरी पेडणेकर यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी चार आठवड्यांच्या मुदतवाढीची विनंती केल्यानंतर, ईडीने समन्स पुन्हा जारी केले.23 नोव्हेंबर रोजी किशोरी पेडणेकर याना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

पेडणेकरांवरील आरोप?

कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना 1800 रुपयांची एक बॅग 6800 रुपयांना विकत घेतल्याचं आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बॉडी बॅग घोटळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं मागील महिन्यात महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांची चौकशी केली होती. बिरादार करोना काळात खरेदी विभागाचे प्रमुख होते. यापूर्वीच ईडीनं करोनाकाळातील कथित अनियमितेबद्दल बिरादार यांचा जबाब नोंदवला आहे. महापालिकेत कोविड काळात कथीत चार मोठे घोटाळे झाल्याचे आरोप असून त्यांपैकी बॉडी बॅग घोटाळा एक आहे.

न्यायलायाकडून दिलासा

कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी अटकेची शक्यता वर्तविण्यात होती मात्र, किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. 4 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांनाअटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच, 11 सप्टेंबर, 13 सप्टेंबर व 16 सप्टेंबर रोजी त्यांना पोलिसांतर्फे होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या परंतु याच प्रकरणी आता ईडीने पेडणेकरांना समन्स बजावले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT