Bribe crime sakal media
मुंबई

25 हजाराची लाच घेताना शिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

या घटनेमुळे पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याची चर्चा सुरुये

सकाळ डिजिटल टीम

या घटनेमुळे पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याची चर्चा सुरुये

पालघर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना एका शिक्षिकेकडून २५ हजारांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. दरम्यान, याप्रकरणी वादग्रस्त शिक्षणाधिकारी लता सानप यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकाची बदली करण्यासाठी ही लाच मागितली असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. या घटनेमुळे पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु आहे .

घडलेली घटना अशी, पालघरमध्ये शिक्षणाधिकारी पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर लता सानप यांच्या उर्मठ वागण्याचा अनुभव अनेकांना आला होता. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी करून त्यांची बदली करावी, यासाठी अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आला होता व तो मंजूर झाला होता. जिल्ह्यातील एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी आज (ता. २५) शिक्षणाधिकारी लता सानप यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सानप यांच्या घरात २५ हजारांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेतले असल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT