mumbai  sakal
मुंबई

खालापूर महावितरण विभागाची पावसाने घेतली परिक्षा

खालापूर विभागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतल्याने विद्युत पुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा

खालापूर : आठवडाभरापासून कोपलेल्या वरुणराजाने महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) विद्युत महामंडळाला (MSEB) देखील हिसका दाखवला असून ठिकठिकाणचा खंडित वीज (Electricity) पुरवठा सुरळीत करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागली आहे. तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. बुधवारी (wednesday) रात्री कमी वेळात पडलेला प्रचंड पावसाचा अंदाज अनेकांना आला नव्हता. त्यामध्ये महावितरण देखील होते.

खालापूर परिसरातील अनेक भाग पाण्याखाली होते. महावितरणाचे डीबी(डिस्ट्रीब्यूशन बोर्ड) देखील कित्येक तास पाण्याखाली गेले होते. खालापूर औद्योगिक पट्टा असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याने महावितरणची धावपळ झाली होती. त्यातच अपुरी कर्मचारी संख्या,अप्रशिक्षित कर्मचारी, साधनसामग्रीची कमतरता यामुळे कामाचा अतिरिक्त भार वाढला होता.

खालापूर महावितरण कार्यालय आणि वावोशी विभाग या दोन्ही विभागात औद्योगिक पट्टा आणि घरगुती वापर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.खालापूर महावितरण कार्यालय अंतर्गत नऊ ग्रामपंचायतीत मिळून जवळपास पंचवीस गावे आहेत.खालापूर महावितरण कार्यालय अंतर्गत जवळपास 5700घरगुती ग्राहक संख्या आहे. औद्योगिक भाग असल्याने जवळपास दहा फिडर खालापूर अंतर्गत येतात.

खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण उपमुख्य कार्यकारी अभियंता व्हि, व्हि गायकवाड आणि खालापूर विभागाचे अभियंता सचिन धनुधर्मी यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बुधवारी दिवसभर खालापूर विभागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतल्याने विद्युत पुरवठा सुरळीत झाला. चार कायमस्वरूपी कर्मचारीमध्ये एक महिला कर्मचारी समावेश आहे. चार वर्षापूर्वी खालापूर महावितरण कार्यालयात कर्मचारी संख्या अकराच्या घरात होती.त्यानंतर कर्मचारी निवृत्तीनंतर नवीन कर्मचारी नेमणूक न झाल्याने सध्या चार कर्मचारी आणि सहा कंञाटी कामगार पंचवीस गावाचा डोलारा सांभाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT