corona death sakal media
मुंबई

कोविड काळात रुग्णांसाठी देवदूत बनलेल्या ८ डॉक्टरांचा मृत्यू; वाचा सविस्तर

कोविड-नाॅन कोविड,आपातकालीन रुग्णांसाठी 108 रुग्णवाहिकेची दौड सुरुच

भाग्यश्री भुवड

मुंबई : आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी (emergency health services) महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) सुरू केलेली 108 रुग्णवाहिका सेवेची (Ambulance service) दौड सुरुच आहे. कोविड-नाॅन कोविड, आपातकालीन रुग्णांसाठी (corona patients) ही सेवा मोठ्या प्रमाणात धावत आहे. 108 रुग्णवाहिकेने मुंबईतील 65 हजारांहून अधिक आपातकालीन रुग्णांना आधार दिला आहे. कोरोनाच्या काळात, रुग्णवाहिका कर्मचार्‍यांसह डाॅक्टरांनी मोठी जोखीम पत्करून संशयित आणि कोरोना रूग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत रुग्णवाहिका सेवेशी संबंधित 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना (more than five hundred positive) कोरोना विषाणूची लागण झाली तर 8 डॉक्टरांसह (Eight doctors deaths) एका ड्रायव्हरला आपला जीव गमवावा लागला आहे. (Eight doctors death in corona pandemic while giving emergency service to patients)

महाराष्ट्र सरकारने भारत विकास ग्रुप (बी‌वीजी) च्या सहकार्याने आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा 108 सुरू केली आहे. 2020 च्या मार्च महिन्यापासून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने राज्यातील 561 रुग्णवाहिका कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी तैनात केल्या होत्या. रुग्णवाहिकेतून मोफत रुग्णांना घरातून रुग्णालयात पोहोचवण्यात आले. बीवीजीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 12 प्रकारच्या गंभीर आणि आपातकालीन परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांना आधार दिला.

1 जानेवारी 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुंबईतील 65 हजार 245 आपातकालीन परिस्थितीतील नागरिकांना संबंधित रुग्णालयात पोहोचवण्याची भूमिका पार पडली. त्यात सर्वाधिक मेडीकल  परिस्थिती(58,821) असलेले रुग्ण होते तर, त्यापाठोपाठ 2,563 गर्भवती आणि प्रसूती पूर्व परिस्थितीत असणाऱ्या महिलांना ही सेवा देण्यात आली. 

तर, राज्यात याच कालावधीत हीच संख्या 11 लाख 28 हजार 065 एवढी आहे. राज्यातील 93 हजारांहून अधिक गर्भवतींना या सेवेचा फायदा झाला आहे. तर, राज्यातील 5 लाख 92 हजार 155 संशयित आणि कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णवाहिकेतील उपस्थित डॉक्टर आणि चालकांनीही या प्रक्रियेत आपली भूमिका बजावली. रुग्णाला स्थिर करण्यापासून त्याला वेळेवर रुग्णालयात नेण्याचे कामही त्यांनी केले आहे. यादरम्यान, 2021 मध्ये 275 कर्मचारी आणि डॉक्टरांना तसेच, 3 डाॅक्टरांना आणि एका ड्रायव्हरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती बीव्हीजीचे मुख्य ऑपरेशन अधिकारी डॉ. डी. शेळके यांनी दिली.

टाॅप 5 जिल्हे- (1जानेवारी ते 25 नोव्हेंबर 2021)

मुंबई- 48,118

चंद्रपूर- 37,267

सोलापूर - 31,785

यवतमाळ - 27,353

अहमदनगर - 25, 511

पुणे - 27,467

11 लाखांना नॉन कोविड सेवा

कोरोना रुग्णांव्यतिरिक्त रुग्णवाहिका इतर रुग्णांच्या सेवेतही रुजू झाली.  रस्ते, रेल्वे अपघात यामुळे रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेतली. 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत 11 लाख 28 हजार 065 रुग्णांना रुग्णालयात नेण्याचे काम करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT