मुंबई

मुंबईत आज 800 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, लोकहो सावधान, निष्काळजी पणा नकोच

मिलिंद तांबे

मुंबई,ता. 23 : आज 800 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,76,507 झाली आहे. तर आज 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत मृतांचा आकडा 10,687 वर पोचला आहे. आज 372 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,52,499 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे.

आधी 300 दिवसांच्यावर असलेला मुंबईत मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर आज 233 दिवसांवर आला आहे. तर 22 नोव्हेंबरपर्यंत एकूण 17,85,308 कोविड चाचण्या करण्यात आल्या. यातील 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.30 टक्के इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 14 मृत्यूंपैकी 12 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 9 पुरुष तर 5  महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते तर 11 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते. 

मुंबईत 390 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 4,280 इतकी आहे. कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 5,821 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड काळजी केंद्रात दाखल करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झालेली आहे. काळजी केंद्र 1 मध्ये 454 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

eight hundred new corona patients detected from mumbai count in rising observe social distancing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT