मुंबई

पवईतील ऍमेझॉन कार्यालयात तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

निलेश मोरे

घाटकोपर  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून न्यायालयाची नोटीस बजावणाऱ्या एमेझॉन कंपनीविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी (ता. 25) पवईतील ऍमेझॉन कार्यालयात तोडफोड केली. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात मनसेच्या आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ऍमेझॉन कंपनीच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर सक्तीने करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती; मात्र असे असताना ऍमेझॉन कंपनीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयामार्फत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. याबाबत मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत मुंबईतील सकीविहार येथील ऍमेझॉन कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केली. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात मनसेच्या आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 664/20 कलम, 452, 153, 145, 147, 149, 427, 506, भादंवि नियमानुसार गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक लक्ष्मण यादव अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी मनसेचे उपविभाग अध्यक्ष प्रफुल्ल दळवी, शाखाध्यक्ष रवींद्र मालुसरे, संतोष मोरे, मनविसे विभाग अध्यक्ष महादेव पवार, नरेंद्र चाळके, राहुल चव्हाण आदींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Eight MNS workers charged in Amazon office vandalism case in Powai

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT