मुंबई

भिवंडीत आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या 

सकाळ वृत्तसेवा


भिवंडी : घराबाहेर खेळणाऱ्या आठ वर्षीय मुलीचे अपहरण करुण तीच्यावर बलात्कार करुण झूडपात दगडाने ठेचून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्‍यातील कारीवली येथिल सुभाषनगर परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण भिवंडी तालुक्‍यात संतापाची लाट पसरली आहे. 


हत्या झालेल्या मुलीचे वडील कारीवली येथे घरातच खानावळ चालवीतात. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर रस्त्यावर आईस्क्रीम विक्रेत्याकडुन आईस्क्रीम घेऊन घरी आली. त्यानंतर घरा बाहेर खेळात असताना अज्ञात नराधमाने तिचे अपहरण केले. त्यानंतर मुलीच्या घरा शेजारील झुडपात तिच्यावर बलात्कार करुन रात्रीच्या अंधारात तिच्या डोक्‍यात दगड घालुन तीची हत्या केली. मुलगी बराचवेळ दिसत नसल्याने तीच्या आई वडिलांनी रात्री दोन वाजेपर्यंत मुलीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.

त्यानंतर सकाळी  6 वाजताच्या सुमारास तेथील झुडपात शौचास गेलेल्या एका व्यक्तीस तिचा मृतदेह आढळून आल्याने त्याने आरडाओरड करीत कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर आईवडिलांनी घटनास्थळी धाव घेतली आपल्या चिमुरडीचा मृतदेह मातापित्याने हंबरडा फोडला.

दरम्यान पीडितेच्या वडिलांनी या घटनेची माहिती गावातील सरपंचाना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन भिवंडीतील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फॉरेन्सिक पथक व श्वान पथकासह विशेष गुन्हे शाखेचे पथके घटनास्थळी दाखल माहिती गोळा करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT