eknath khadse
eknath khadse 
मुंबई

"झोटिंग समितीचा अहवाल लपवण्यात आलाय"; काँग्रेसचा आरोप

विराज भागवत

अजित पवारांना अधिकारी वर्गाकडून फाईल गहाळ झाल्याचं मिळालं उत्तर

------------------------------------------

मुंबई: एकनाथ खडसे यांची चौकशी केलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांतून देण्यात आले आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंवर आरोप झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग समिती नेमली होती. या समितीने 2017 मध्ये आपला अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सपूर्द केला होता. तो अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याचे बोलले जात आहे. अशातच, "त्या अहवालाला पाय नाहीत... त्यामुळे तो अहवाल लपवण्यात आला असणार", असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. (Eknath Khadse Zoting Committee Report Congress Atul Londhe alleges that file deliberately missing)

झोटिंग समितीच्या अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे? हे पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांना या फाईलची विचारणा केली होती. त्यावेळी हा अहवाल कुठेच सापडत नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. यावर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीस सरकारवर नाव न घेता आरोप केला. "अशा प्रकारे अहवाल गहाळ करण्यासाठी स्वायत्त संस्थांचा वापर झालेला दिसतो. झोटिंग कमिटीचा अहवाल दोन वर्षांपूर्वी आला होता. त्याच वेळी तो अहवाल सर्वांसमोर का आणला नाही? हा अहवाल हरवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई व्हायला हवी. खडेस यांच्याबाबत अहवालात काय होतं, ते समोर यायलाच हवं. हा अहवाल गायब व्हायला त्याला पाय नाहीत. म्हणजेच हा अहवाल लपवण्यात आला आहे", असा थेट आरोप लोंढे यांनी केला.

Eknath Khadse

एकनाथ खडसेंच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेला दिनकर झोटिंग समितीच्या अहवालात नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी खडसेंना आतापर्यंत पाच वेळा ईडी कार्यालयात चौकशीसाठी जावं लागलं. सध्या भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलेले एकनाथ खडसे ईडीच्या रडारवर आहेत. खडसेंच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा आणि याच वेळी अहवाल गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT