Eknath Shinde omi kalani  sakal
मुंबई

Eknath Shinde: पवारांनंतर उल्हासनगरात ओमी कालानींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Sharad Pawar:ओमी कालानी यांचे राजकारणाचे असेही डावपेचची चर्चा शहरात रंगली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Eknath Shinde: सोमवारी 12 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नॅशलिस्ट काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही दिग्गज नेते उल्हासनगरात आले होते.तेंव्हा सभेला जाण्यापूर्वी पवार यांनी प्रथम राजकारणातील केंद्रबिंदू असणाऱ्या कालानी महालाला भेट देऊन युथ आयकॉन ओमी कालानी आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा पंचम कालानी यांच्याशी चर्चा केली.

शरद पवार हे सभेसाठी निघाल्यावर ओमी कालानी यांनी महानगरपालिका रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची ओमी कालानी यांनी टीमसोबत भेट घेतली.यावरून ओमी कालानी यांचे राजकारणाचे असेही डावपेचची चर्चा शहरात रंगली आहे.

शरद पवार हे संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या महाएल्गार सभेसाठी आले होते.पप्पू कालानी हे आमदार असताना 40 वर्षांपूर्वी कालानी महालात आले होते.राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कालानी यांचे 2021 मध्ये निधन झाल्यावर पवार यांना येता आले नव्हते.संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या महाएल्गार सभेला आल्यावर शरद पवार यांनी प्रथम 40 वर्षानंतर कालानी महालाला भेट दिली.आणि ओमी कालानी,पंचम कालानी यांची भेट घेतली.

शरद पवार हे सभेसाठी गेल्यावर ओमी कालानी यांनी महानगरपालिकेच्या सुपर स्पेशालिटी झिरो कॅश काऊंटर रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे परतीच्या मार्गावर असताना शहाड हायवेवर त्यांची भेट घेतली.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम,मनोज लासी,सुमित चक्रवर्ती,नरेंद्रकुमारी ठाकूर,पितू राजवानी,शिवाजी रगडे,रवी पंजाबी, संतोष पांडे आदी उपस्थित होते.ज्योती कालानी ह्या आमदार असताना त्यांच्या प्रयत्नाने सिंधू भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन करण्याची मागणी माजी नगरसेवक नरेंद्रकुमारी ठाकूर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.तेंव्हा शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिले.

ओमी कालानी यांची पत्नी पंचम कालानी ह्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष असून ओमी यांची टीम ओमी कालानी ही संघटना आहे.अशात पक्ष कोणताही असो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचाच प्रचार करणार आणि स्वतः आमदारीची अपक्ष निवडणूक लढवणार.मी शब्द मागे घेणार नाही.अशी कमिटमेंट ओमी कालानी यांनी यापूर्वीच केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT