मुंबई

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचं ठाणं प्रदूषणाच्या विळख्यात !

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde: शहरात सुरू असलेली बांधकामे, तसेच मेट्रोची कामे यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ठाणे शहरातील हवा ही वाढलेल्या धुळीमुळे मध्यम प्रदूषित गटात मोडत असल्याची बाब प्रदूषण विभागाने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तपासलेल्या हवेच्या गुणवत्तेवरून समोर आली आहे.

यात तीन हात नाका परिसरात सर्वाधिक प्रदूषित आहे. येथे सर्वाधिक हवेच्या गुणवत्ता निर्देशांक १६० इतका असून धूलिकणांचे प्रमाण १९० इतके आढळून आले. तीन हात नाका, यानंतर घोडंबदर, कोलशेत, ढोकाळी, वर्तकनगर, कळवा येथील हवा प्रदूषित असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे

मुंबई शहराला लागून असलेल्या ठाणे शहराच्या हवेची पातळी घसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार शहरातील विविध भागांत ऑक्टोबर महिन्यात २३ ते ३१ या काळात केलेल्या सर्वेक्षणात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १४५.५ इतका आढळून आल्याने प्रदूषणात वाढ झाली असल्याचे दिसून येत असून ही गुणवत्ता मध्यम प्रदूषित अशा पिवळ्या गटात मोडत आहे.

ठाणे शहरात सर्वाधिक प्रदूषण हे तीन हात नाका परिसरात आहे. येथे हवेच्या गुणवत्ताचा निर्देशांक १६० इतका आहे. तसेच येथील हवेतील धूलिकणांचे प्रमाण १९० इतके आढळून आले. या परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे.

तसेच वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक व्यग्र असलेले हे ठिकाण आहे. त्यामुळे येथे धूळ आणि धुराचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ कोलशेत, ढोकाळी, वर्तकनगर, कळवा या विभागांचा क्रमांक येतो. एकंदरीत सध्या जरी ठाणे शहर मध्यम प्रदूषित गटात मोडत असली तरी येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांच्या आतषबाजीने ठाण्याची हवा प्रदूषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नौपाडा परिसरात सर्वात कमी प्रदूषण

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाने त्यांच्या अॅपवर प्रसिद्ध केलेल्या माहितीत सर्वात कमी प्रदूषण हे व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट नौपाडा परिसरात १२० हवेचा गुणवत्ता निर्देशांक आढळून आला आहे. त्यात धूलिकणांचे प्रमाण १३० आहे. औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अ‍ॅण्ड कंपनी अंतर्गत वर्तक नगर आदी ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२४ आढळून आला असून धूलिकणांचे प्रमाण १३५ आहे. निवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभागात १३८ हवेतील गुणवत्ता निर्देशांकाची नोंद असून धूलिकणांचे प्रमाण १५७ आढळून आले.

प्रदूषण रोखण्यासाठी अद्याप कारवाई नाही

घोडंबदर, कोलशेत, ढोकाळी, वर्तकनगर, कळवा आदींसह शहराच्या बहुतेक भागात सध्या नव्याने गृहसंकुले उभी राहत आहेत. या गृहसंकुलांच्या ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्त्यावर माती किंवा धूळ प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT