devendra fadnavis dharmveer 3 script esakal
मुंबई

Dharmveer Movie: ‘धर्मवीर ३’चे स्क्रीप्ट मी लिहिणार ! फडणवीस यांनी का केला मोठा दावा?

'धर्मवीर २' चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदुत्वाकडे वाटचाल आणि 'जय महाराष्ट्र' घोषणा हायलाइट करण्यात आली आहे. चित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित कथा मांडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना ‘धर्मवीर २’ हा शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटचालीवर आधारित असलेला चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या चित्रपटात काही मिनिटांसाठी झळकले आहेत. आता वाटचाल हि्ंदुत्वाकडे या आशयाचा त्यांचा संवाद आणि गाडीत बसून म्हटलेले ‘जय महाराष्ट्र’ हा या चित्रपटाचा परमोच्च बिंदू मानला जात आहे.

हिंदुत्वापासून फारकत घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वैचारिक निष्ठा बदलल्याच्या धोरणावर हल्ला हे या चित्रपटाचे सूत्र आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचे नाव चित्रपटात एकदाही नाही. बंडाच्या निर्णयाची पार्श्वभूमी उलगडून सांगणाऱ्या या चित्रपटात शिंदे यांच्या समवेत राहिलेल्या बहुतांश आमदारांचे चित्रण आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली आहे.

निमंत्रितांसमोर गुरुवारी(ता.२६) या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. आनंद दिघे यांचे ठाणे परिसरातील काम, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी त्यांनी केलेले काम या पार्श्वभूमीवर त्यांच्या संस्कारात तयार झालेले शिंदे यांचे नेतृत्व आणि मविआ सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेली अस्वस्थता या भोवती हा चित्रपट गुंफला आहे. शिवसेनेची संघटना हिंदुत्वापासून दूर राहू नये यासाठी आनंद दिघेंच्या स्मृतींना दिलेले आश्वासन हा या चित्रपटाचा परमोच्च बिंदू.

कोरोना काळात शिंदे यांनी केलेले मदतकार्यही चित्रपटात दाखविले आहे.अभिनेते क्षितीश दाते यांनी या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका केली असून प्रसाद ओक यांनी चित्रपटाच्या भाग एकप्रमाणे दुसऱ्या भागातही आनंद दिघे साकारले आहेत.

‘धर्मवीर ३’चे स्क्रीप्ट मी लिहिणार : फडणवीस

चित्रपटाच्या प्रिमियरला आनंद दिघे यांच्या चरित्रावर हा चित्रपट आहे हे सांगतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर ३’चे स्क्रीप्ट मी लिहिणार असल्याचे घोषित केले. धर्मवीरचा दुसरा भाग आमदार गुजरातकडे निघतात, या प्रसंगावर तसेच फडणवीस यांची भूमिका करणारे अभिनेते सुनील बर्वे हिंदुत्वासाठी कटिबद्ध असणाऱ्यांना आम्ही मदत करणार, असे सांगतात, तेथे थांबतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT