Dussehra Melava Teaser Released ESakal
मुंबई

Dasara Melava: हिंदुत्वाचा मुद्दा, व्यंगचित्रातून ठाकरेंना घेरलं, एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित

Dussehra Melava Teaser Released: एकनाथ शिंदेंचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. यासाठी शिवसेनेने टीझर प्रदर्शित केला आहे.

Vrushal Karmarkar

Dussehra Melava Teaser Released: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. तेव्हापासून दरवर्षी दसरा मेळावा आयोजित केला जातो. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत स्वतंत्र दसरा मेळावा घेतात. यंदाही उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. याआधी दोन्ही पक्षांनी याचे टीझर प्रदर्शित केले आहे. आता शिंदेसेनेने टीझर प्रदर्शित करत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाच्या टीझरमधून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. यात कॉंग्रेसच्या पंजाला हात बांधलेला दिसत आहेत. त्या हातावर एकनाथ शिंदे यांनी बाण मारला आहे. यात व्यंगचित्राचा वापर केला आहेत. यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच "मराठी आपला श्वास, हिंदुत्व आपला प्राण चलो आझाद मैदान... वाजत गाजत या, गुलाल उधळत या" असं यात लिहिलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने हा टीझर शेअर केला आहे. या टीझरची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा दिसल्याने होते. त्यानंतर शिवसेना असं नाव लिहिलेला वाघ दिसत आहे. या वाघाच्या गळ्यात पट्टा आहे आणि तो पट्टा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या पंजाला बांधल्याचे दाखवण्यात आले. यानंतर एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण घेऊन येतात. त्यानंतर त्या पट्ट्यावर बाण मारून तो पट्टा तोडतात. पट्टा तुटताच शिवसेना नाव असलेला वाघ एकनाथ शिंदेंना मिठी मारतो, असं यात दाखवण्यात आले आहे. यात हिंदुत्व हाच मुद्दा पकडून हा व्हिडिओ केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT