eknath shinde sakal
मुंबई

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde’s Powerful Speech at Dussehra Rally राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी, भरभरून मदत करण्याचे आवाहन केले. जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Eknath Shinde targets Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये पार पडतोय. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी, भरभरून मदत करण्याचे आवाहन केले.

तसेच, राज्य सरकार तर मदत करत आहेच, शिवाय शिवसेनाही सर्वोतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. तसेच, यावेळी त्यांनी मी वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा नाही, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले, मी वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा नाही. आपत्तीत घरात बसणारा शिवसैनिक असूच शकत नाही. तो बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही. बाळासाहेब म्हणायचे संकाटात कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात दिसला पाहीजे. त्यानुसारच माझा शिवसैनिक मदत करतोय, रिकाम्या हाताने गेला नाही तर सोबत सर्व आवश्यक साहित्य देण्यासाठी घेवून गेला.

एकनाथ शिंदे जाण्याआधी बळीराजाला मदत पोहचली.. डॉक्टरांची पथकं तिथे पोहचली. ही आमची मदत करण्याची पद्धत आहे. मात्र काही लोक केवळ तोंड घेवून शेतकऱ्यांकडे गेली, आणि ते आज आमच्यावर टीका करताय.. त्यांना काहीही अधिकार नाही आमच्यावर बोलण्याचा. सर्वसामान्य माणूस हाच आमचा केंद्रबिंदू आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी म्हणत होतो की मी सामान्य माणूस आहे. शेवटी सर्वसामान्य माणसाशी नाळ तुटता कामा नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, पण भारताला २०० धावांच्या आत रोखण्यात झिम्बाब्वेला यश; श्रेयस अय्यरची टीम व्हाईटवॉश देणार?

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

Viral Video : अंतराळातून दिसला भारताचा थक्क करणारा नजारा; वादळी ढग अन् विजांचा कडकडाट, ISS चा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : AIMIMच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूरमध्ये खळबळ

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

SCROLL FOR NEXT