Eknath shinde  Sakal
मुंबई

Eknath Shinde : २७ पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार अशक्य?

शिवसेना आणि बंडखोर गटाच्या याचिकांवरील न्यायालयाच्या सुनावणीनंतरच नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त असू शकतो

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्याने शुक्रवारी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली; प्रत्यक्षात या दौऱ्यानंतरही म्हणजे, येत्या २७ पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना आणि बंडखोर गटाच्या याचिकांवरील न्यायालयाच्या सुनावणीनंतरच नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त असू शकतो. नव्या मंत्र्यांचा शपथविधी लवकरच होईल यापेक्षा वेगळे उत्तर सरकारकडून दिले जात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन आता २० दिवस होत आले तरी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्या गोटात अस्वस्थता असल्याची चर्चा होती. त्यावरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही सत्ताधाऱ्यांना डिवचले. तरीही, मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग आला नाही.

शिवसेना आणि बंडखोर गटांत न्यायालयात लढा सुरू असून, त्यावर आता एक ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यामुळे लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार पुढच्या दोन-चार दिवसांत होण्याचा अंदाज होता. त्यातच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभासाठी हे दोघे दिल्लीत गेले असून, या दौऱ्यात सत्तावाटपावरून अंतिम चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, त्याला दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे किमान आठवडाभर तरी मंत्रिमंडळ विस्ताराविनाच हे सरकार काम करणार असल्याचे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT