मुंबई

एकनाथ शिंदे सेनेत अस्वस्थ, लवकर भाजपमध्ये घेऊ; राणेंचा गौप्यस्फोट

नामदेव कुंभार

राज्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु असतानाच केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नारायण राणेंनी थेट एकनाथ शिंदेंचे नाव घेत ते शिवसेनेत कंटाळले असून त्यांना लवकर आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे. वसईत जनआशिर्वाद यात्रेमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

जनआशीर्वाद यात्रेसाठी राणे शनिवारी पालघर जिल्ह्यामध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. वसई-विरार-नालासोपारा भागात ही यात्रा काढण्यात आली आहे. वसई चिंचोटी येथे त्यांचे ढोल-ताशाचा गजर, आदिवासी तारपा नृत्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. जनआशीर्वाद यात्रा आज दिवसभर पावसातच सुरू होती. जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने वसईत आलेल्या राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची ‘चिरंजीव मंत्री’ म्हणून खिल्ली उडवली.

राणे यांच्या या वक्तव्यावर नंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तुर्तास कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही झाल्या होत्या. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. आता नरायण राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी 10 महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.

एकनाथ शिंदेविषयी राणे काय म्हणाले?

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी राणे म्हणाले की, शिंदे हे फक्त सहीपुरते मंत्री आहेत. सर्व अधिकार ‘मातोश्री’कडे आहेत. ते स्वतः अस्वस्थ आहेत आणि शिवसेनेला कंटाळले आहेत. मी त्यांना फोन करणार आहे. ते भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंद वाटेल. आम्ही त्यांचे स्वागत करू.

गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार द्या! -

‘‘राज्यात तीन लाख कामगार बेकार आहेत, साडेतीनशेच्या वर छोटेमोठे उद्येगधंदे बंद झाले आहेत, त्यामुळे गोमूत्र शिंपडण्यापेक्षा राज्यातील तरुणांना रोजगार द्या,’’ असा प्रहार नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

मनसेशी युती झाल्यास आनंद

मनसे आणि भाजप यांच्यात युती झाली तर मला आनंदच होणार आहे. जिथे आघाडी होते, तिथे बिघाडी होते, असा राज्यातील महाविकास आघाडीला टोला मारत, आम्ही मनात आणले तर महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार कधीही विसर्जित करू शकतो, असा इशारा राणे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'मधील गैरव्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी करा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT