Eknath Shinde News | Maharashtra Political News Sakal
मुंबई

एकनाथ शिंदे : मुंबई नव्हे, तर ठाण्यातील बंगल्यावर कट शिजला

ठाण्याच्या महापौर बंगल्यावर शिजली बंडाळी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत सुरत गाठले. मात्र सुरतला जाण्याआधी या बंडाळीची ‘खिचडी’ ठाण्याच्या महापौर बंगल्यावर शिजल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर उपवन येथे असलेल्या महापौर बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. यावेळीच या घटनाक्रमाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.(Eknath Shinde News)

विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्या आधी काय घडले, आमदारांना त्यांनी कुठे विश्वासात घेतले याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. याचवेळी अशी माहिती समोर आली आहे की, सुरतला जाण्याआधी एकनाथ शिंदे रात्री नऊच्या सुमारास उपवनच्या महापौर बंगल्यावर काही तासांसाठी होते. हे ठिकाण त्यांच्या आवडीचे असून अनेक निर्णय ते या निसर्गरम्य परिसरातील बंगल्यावर घेतात. येथेच त्यांनी त्यांच्या विश्वासातील आमदारांशी चर्चा केली. पुढील राजकीय वाटचालीविषयी खलबते केल्यानंतर ते सुरतला रवाना झाले.

शांताराम मोरे आयोध्या दौऱ्यावरुन घरी आलेच नाहीत - पत्नी आशा मोरे

भिवडीं ग्रामीणचे शिवसेना आमदार १५ जून रोजी आयोध्येला गेले होते. तेथून ते परत घरी आलेच नसून गेले दोन दिवस त्यांच्याशी कोणताच संपर्वâ नसल्याचे पत्नी आशा मोरे यांनी सांगितले. शांताराम मोरे हे आमदार होण्याआधी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांचे चालक होते. २००९ साली ही विधानसभा जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव झाल्यामुळे मोरे यांना अचानक उमेदवारी मिळाली. तेव्हापासून त्यांनी तीन वेळा आमदारकीची हॅट्रीक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT