eknath shinde dasara melava 
मुंबई

Shivsena: महाराष्ट्र धनुष्यबाणमय करण्यासाठी एकनाथ शिंदे सज्ज; नव्याने करणार पक्षाची बांधणी

सकाळ डिजिटल टीम

Shivsena: आगामी लोकसभा निवडणुकीत आता सगळ्याच लोकसभेच्या जागा जिंकण्याचे ‘मिशन ४८’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून आणण्याचा ठराव आज मुंबईत झालेल्या शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधी सभेत मंजूर करण्यात आला. शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानांतर्गत आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार निवडून आणण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

शिवसेनेची प्रतिनिधी सभा रविवारी (ता. ३) मुंबईतील ‘रामटेक’ बंगल्यावर पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, आनंदराव अडसूळ, महिला नेत्या मीना कांबळी, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले आणि सर्व मंत्री, खासदार, आमदार, उपनेते, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तीन राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अभिनंदनाच्या ठरावासह अन्य तीन ठरावही मंजूर करण्यात आले.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस असून भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तेलंगणामधील आदिलाबादचे भाजप उमेदवार पायल शंकर हे तीन वेळा पराभूत झाले होते. मात्र, यावेळी मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार केल्यानंतर त्यांचा विजय झाला. बाहेरील राज्यात शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आपल्याबद्दल कुतूहल असून त्याचेच चित्र राजस्थान आणि तेलंगणा येथे पाहायला मिळाले, असे शिंदे यांनी सांगितले.

नव्याने पक्षाची बांधणी

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने आपल्याला दिल्यानंतर आता या पक्षाची नव्याने बांधणी करायची आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांना दिलासा देणारे अनेक निर्णय आपण घेतले असून एक रुपयात पीकविमा, विनामूल्य आरोग्य सेवा, शेतीला दुप्पट नुकसानभरपाई, ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि ‘लेक लाडकी’ असे पथदर्शी निर्णय आपण घेतले आहेत. त्यामुळे हे निर्णय आता लोकांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त लोकांना त्यांचे लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू

शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतःच्या प्रतिकात्मक सदस्य नोंदणी अर्जावर स्वाक्षरी घेऊन नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली.

प्रत्यक्ष सदस्य नोंदणी अर्ज भरून देणे किंवा ७७०३०७७०३० या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन येणाऱ्या लिंकवरील फॉर्म भरून पक्षाचे सदस्यत्व घेणे किंवा क्यूआर कोड स्कॅन करून फॉर्म भरून त्यानंतर ओळखपत्र डाऊनलोड करून सदस्यत्व, घेणे असे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

बीआरएसमध्ये शांतता

महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी हिताचे मुद्दे घेऊन उतरलेल्या भारत राष्ट्र समितीचा तेलंगणमध्ये पराभव झाल्याने राज्यातील स्थिती धूसर झाली आहे. आज तेलंगणमधील निकालानंतर महाराष्ट्रातील बीआरएसमध्येही सामसूम पसरली आहे.

प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक तसेच प्रमुख नेमण्यात आला होता. भाजपच्या माध्यमातून निवडून आलेले माजी आमदार चरण वाघमारे हे नेतेही सक्रिय होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT