Blood Donation sakal media
मुंबई

ठाणे : महारक्तदान सप्ताहात विक्रमी रक्तसंकलन

ठाण्यात तब्बल ११,००२ बाटल्या जमा

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राज्यभरात असलेला रक्ततुटवडा (blood shortage) लक्षात घेऊन नवरात्रीचे औचित्य साधून (Navratri festival) ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महारक्तदान सप्ताह (blood donation camp) उत्साहात झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे सात दिवसांत विक्रमी तब्बल ११ हजार २ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.

भिवंडीचे विनीत म्हात्रे हे १० हजारावे रक्तदाते, तर कोपरी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ममता डिसुझा ११ हजाराव्या रक्तदात्या ठरल्या. ठाण्यातील जांभळी नाका येथे महारक्तदान सप्ताहाला ८ ऑक्टोबरला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजे ७ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यांतील ब्लड बँकांमध्ये एकूण १० हजार ४०० बाटल्या रक्तसाठा उपलब्ध होता. शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान सप्ताहात अवघ्या सात दिवसांत ११ हजार २ बाटल्या रक्तसंकलन झाल्यामुळे या ब्लड बँकांना, तसेच रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यशस्वी आयोजनात योगदान देणारे डॉक्टर्स, ब्लड बँकांचे प्रतिनिधी, आरोग्यसेवक, शिवसेनेचे निवडक पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, अभिनेते कुशल बद्रिके, ठाणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, परिमंडळ एकचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनीही रक्तदान केले.

या वेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, अभिजित चव्हाण आदींनी रक्तदात्यांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शांताराम मोरे, महापौर नरेश म्हस्के, ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

"रक्तदान हे पुण्याचे काम असून, आपल्या एक बाटली रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अद्याप प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या रक्त तयार करता येत नाही. त्यामुळे माणसालाच माणसाचा जीव वाचवण्याचे काम करायचे असून, अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहिजे."

- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या रणधुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT