Eknath Shinde:  sakal
मुंबई

Eknath Shinde: मुख्यमंत्री आज नवी मुंबईत, ठाण्यासाठी लावणार संपूर्ण ताकद

सकाळ वृत्तसेवा

Vashi News: ठाणे लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत येणार आहेत. यावेळी काढण्यात येणाऱ्या रॅलीतून महायुती शक्तिप्रदर्शन करणार आहे. (eknath shinde in navi Mumbai)

शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचा हा दुसरा नवी मुंबई दौरा आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी आपली संपूर्ण ताकद ठाणे लोकसभेसाठी पणाला लावल्याचे दिसून येते आहे.

त्यामुळे ठाणे लोकसभेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली असून लढतीची रंगत वाढली आहे. यापूर्वी ९ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी तुर्भे गाव ते नेरुळ या भागात झालेल्या भव्य बाईक रॅलीत सहभाग घेतला होता.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मतांनी विजयी करा, या आवाहनाखेरीज कोणतेही राजकीय भाष्य करणे टाळले होते. परंतु, त्यानंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री नवी मुंबईकरांशी संवाद साधणार असून कोणावर निशाणा साधणार? याकडे नवी मुंबईतील मतदारांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT