file photo saka
मुंबई

Mumbai Crime: मोठ्या भावाची लहान भावांकडून हत्या

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: मालाड आणि मालवणीतील दोन घटनेत मोठ्या भावांची लहान भावांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. डेमियन मार्कोस डिसा आणि जॉय जॉन पॉल अशी मृतांची नावे आहेत.

याप्रकरणी बांगूरनगर आणि मालवणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील एका प्रकरणात जोश जॉन पॉल या भावाला मालवणी पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या गुन्ह्यांतील आरोपी भाऊ ड्रेसन डिसा पळून गेला असून त्याचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे यांनी सांगितले.

डेमियन डिसा मालाडच्या पद्मानगरात भावाच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. वैद्यकीय कारणांमुळे ड्रेसनने त्याची संपत्ती विकण्याचा निर्णय घेतल्याने डेमियनने त्याला विरोध केला. यातून शुक्रवारी दोघांमध्ये वाद होऊन ड्रेसनने डेमियनच्या डोक्यात कुंडी घालून त्याची हत्या केली.

दुसऱ्या घटनेत मालवणीतील साईदर्शन सोसायटी चाळीत जॉय आणि जोश हे दोन भाऊ राहत होते. शुक्रवारी रात्री उशिरा जॉय दारुच्या नशेत घरी आल्याने जॉयसोबत त्याचा पैशांवरून वाद झाला. या वादातून जोशने जॉयला जमिनीवर आपटले. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने जॉयचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT