election news BJP Congress object to reservation release process mumbai
election news BJP Congress object to reservation release process mumbai sakal
मुंबई

मुंबई : आरक्षण सोडत प्रक्रियेवर भाजप, कॉंग्रेसचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर शुक्रवारी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र या सोडतीवरही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतले आहेत. ओबीसी आरक्षणाची सोडत प्रक्रिया चुकीची आहे, असा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. या आरक्षण प्रक्रियेवर हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसही कोर्टातली लढाई तीव्र करण्याच्या तयारीत आहे. 

ओबीसी आरक्षित जागा ठरवाताना यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राधान्यक्रमाची पद्धत अंमलात आणली. सन २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत जे प्रभाग कधीही ओबीसीसाठी आरक्षित नवहते असे प्रभाग प्राधान्यक्रम १ मध्ये निवडण्यात आले आहेत. असे ५३ प्रभाग जाहीर करण्यात आले. मात्र या प्रभागांमध्ये काही प्रभाग असे आहेत जे गेल्या निवडणुकीत आरक्षित होते तरीही यावेळी पुन्हा आरक्षित झाले असल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांची यंदा पुनर्रचना करण्यात आली आहे. २२७ प्रभागांमध्ये आणखी नवीन ९ वॉर्ड वाढल्याने प्रभागांची संख्या २३६ झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे मागील दोन तीन निवडणूकांधील आरक्षण गृहित धरण्यापेक्षा ओबीसी आरक्षणासाठी संपूर्ण सोडत काढावी अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.

सलग २३ वॉर्डमध्ये आरक्षणामुळे कॉंग्रेसचा सवालमुंबईत सलग २३ वॉर्डमध्ये आरक्षण कसे काय येऊ शकते ? असा प्रश्न मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. सलग १६९ ते १९३ वॉर्डमध्ये आरक्षण आहे. अशावेळी मुंबईत इतर लोकांना न्याय मिळणार का ? असाही सवाल त्यांनी केला आहे. आम्ही हा सगळा डेटा न्यायालयात मांडणार आहोत. त्यामध्ये पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया होत नसल्याची बाब मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT