mumbai sakal
मुंबई

Mumbai : एक कोटींच्या बेकायदेशीर वीज चोरीचा पर्दाफाश ; अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाकडून कारवाई

अंधेरी पूर्व येथील प्लास्टिक मोल्डिंग व्यवसाय चालवणाऱ्या मेसर्स क्रोहास्ट प्लास्टिक मोल्डिंग मॅन्युफॅक्चरर लिमिटेडविरुद्ध १.०९ कोटी रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाने अंधेरी पूर्व येथील प्लास्टिक मोल्डिंग व्यवसाय चालवणाऱ्या मेसर्स क्रोहास्ट प्लास्टिक मोल्डिंग मॅन्युफॅक्चरर लिमिटेडविरुद्ध १.०९ कोटी रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.

वीज कायदा २००३च्या कलम १३५ अंतर्गत गैररित्या थेट पुरवठा केल्याबाबतचे प्रकरण दाखल झाले आहे. याबाबत, पथकाने मोल्डिंग व्यवसायाचे मालक आणि अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे नोंदणीकृत ग्राहक असलेल्या पंकज वासुदेवन नायर यांच्याविरुद्ध खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये १५ जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे.

मेसर्स क्रोहास्ट प्लास्टिक मोल्डिंग मॅन्युफॅक्चरर लिमिटेडविरुद्ध संशयास्पद हालचाली दक्षता पथकाच्या निदर्शनास सुरुवातीला आल्या.

परंतु त्यांना पुराव्यासह पकडण्यात यश आले नाही. त्यानंतर पथकाने यावेळी योग्य नियोजनासह १३ जुलै रोजी सदर स्थळी छापा टाकला आणि गैररित्या केलेल्या थेट पुरवठा प्रकरणाचा अखेर छडा लावला.

मेसर्स क्रोहास्ट प्लास्टिक मोल्डिंग कंपनीमध्ये संबंधित स्त्रोतातून तीन फेज थेट वीज पुरवठा जोडणी घेतली गेली आणि चेंजओव्हर स्विचपर्यंत ते विस्तारित करण्यात आले. ५८ किलोवॅटच्या लोडसाठी थेट पुरवठा घेतला जातो मात्र संबंधित ग्राहक मीटरचा पुरवठा थेट पुरवठ्याकडे वळवण्यासाठी चेंजओव्हर स्विच वापरत होता.

चार वर्षे आणि सात महिन्यांच्या कालावधीसाठी ५,६१,५९८ युनिटसाठी रु. १,०९,८२,५४४ इतक्या किमतीची वीजचोरी उघडकीस आली आहे.

वीजचोरी प्रकरणावर भाष्य करताना अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले, “सतर्कतेने महिनाभरात उघडकीस आणलेली चोरीची दुसरी मोठी घटना आहे. दक्षता पथकाने जून २०२३ मध्ये रु. १.३३ कोटीच्या वीज चोरीचे प्रकरण उघडकीस आणले होते.

कुरार गाव, मालाड येथे थ्री-फेज थेट पुरवठ्याद्वारे बेकायदेशीरपणे इलेक्ट्रोप्लेटिंगचा व्यवसाय करणाऱ्या जैनी ट्रेडर्सविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजचोरी रोखल्याबद्दल आम्ही आमच्या पथकाचे अभिनंदन करतो.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT