मुंबई

मुंबईकरांचं आणि मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचं प्रेम पडलंय धूळ खात, आठ कोटींचा होतोय चुराडा

सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील डबलडेकर बसेससाठीची क्रेझ कमालीची आहे. मुंबईत जो कुणी येतो त्यांची या डबल डेकर बसेसमधून मुंबई दर्शन करण्याची इच्छा असते. अशात तुम्ही सांताक्रुजमधील बस डेपोमध्ये एक नजर टाकाल तर तुम्हाला रांगेत काही AC डबलडेकर बसेस पाहायला मिळतील. एक दोन नव्हे तर तब्बल अकरा AC डबलडेकर बसेस सांताक्रुजमधील बस डेपोत काही दिवस नव्हे तर तब्बल दोन वर्ष पडून आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या बसेस अशाच धूळखात पडल्या असल्याने या बसेस पूर्णतः खराब होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांना मुंबईची सफर करता यावी यासाठी या बसेस घेण्यात आल्या होत्या. मात्र आता या बसेस गेल्या दोन वर्षांपासून अशाच धूळखात पडल्याआहेत दरम्यान MTDC कडून या बसेसची सर्व्हिस करून सेवेत आणणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

सरकारकडून 'हॉप ऑन, हॉप ऑफ' किंवा 'हो, हो' बसेसची तब्बल आठ कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली. या बसेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते संजय गांधी नॅशनल पार्क अशा चालवल्या जात होत्या. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या बसेस केवळ धूळ खात सडत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईकरांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

या बसेस ४६ सीटर असून या बसेसच्या खालील भागात AC आहे. तर वरील भाग हा खुला आहे. या बसेसमध्ये कॉफी मशीन, मायक्रोवेव्ह, उत्तम म्युझिक सिस्टीम अशी साधने देखील आहेत. सध्या दिल्ली, गोवा, चंधीगडमध्ये अशा बसेस  चालवल्या जातायत. 

या आधी खास मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी नीलांबरी या डबलडेकर बसेस चालवल्या जात होत्या. दरम्यान, या बसेस पूर्ववत झाल्यात तर लवकरात लवकर मुंबईतील रस्त्यावर उतरवल्या जाऊ असतात  असं MTDC चे अधिकारी म्हणालेत.

Eleven AC Double Decker Buses Rotting In Santacruz Depot For Over 2 Years

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT