मुंबई

यावर्षी अकरावी प्रवेशाच्या जागा घटल्या; प्रवेशासाठी फक्त 'इतक्या' जागा उपलब्ध

तेजस वाघमारे


मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रकियेसाठी यंदा 3 लाख 20 हजार 120 जागा उपलब्ध आहेत. यंदा या जागांमध्ये सुमारे सहा हजारांची घट झाली आहे. सर्वाधिक जागा या वाणिज्य शाखेच्या आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना 1 ऑगस्टपासून प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत राबविण्यात येते. गत वर्षी मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी सुमारे 3 लाख 26 हजार जागा उपलब्ध होत्या. अंतर्गत गुणामुळे निर्माण झालेला गोंधळ सोडविण्यासाठी काही महाविद्यालयांना केवळ एका वर्षासाठीच जागांमध्ये वाढ करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा प्रवेशाच्या जागा कमी झाल्या अाहेत. कमी झालेल्या जागांमध्ये 5 टक्के जागा या विज्ञान शाखेच्या तर 8 टक्के जागा या वाणिज्य आणि कला शाखेच्या अाहेत. यंदा 838 कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया होणार अाहे. गेल्यावर्षीपेक्षा महाविद्यालयांची संख्या वाढली असली तरी सेल्फ फायनान्स तत्वावर मान्यता मिळालेली काही महाविद्यालये बंद झाल्यानेही जागांमध्ये घट झाल्याचे बोलले जात आहे.

शाखानिहाय उपलब्ध जागा

  • - कला 37,300
  • - वाणिज्य 1,73,960
  • - विज्ञान 1,03,190
  • - एमसीव्हीसी 5670
  • एकूण 3,20,120

-----------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT