Jail 
मुंबई

तुरुंगातही आपत्कालीन व्यवस्थापन

मंगेश सौंदाळकर

मुंबई - देवभूमी केरळमधल्या महापुराचा धसका राज्य तुरुंग प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी तुरुंग प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन धोरण राबवण्याचे ठरवले आहे. नुकत्याच आलेल्या महापुराच्या वेळी केरळमधील तुरुंगात कोणत्या उपाययोजना राबवल्या होत्या, त्याचा अभ्यास करण्याकरता तुरुंग प्रशासनाचे पथक लवकरच तिथे जाणार आहे. त्यानंतर आपत्कालीन योजना राबविण्याबाबत अहवाल तयार होईल.

तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती, ३१ जिल्हा, १३ खुली आणि १७२ उपकारागृहे आहेत. किरकोळ ते गंभीर गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या कैद्यांना विविध बॅरेकमध्ये ठेवले जाते. नैसर्गिक आपत्ती किंवा घातपाती कृत्ये घडल्यास त्याला कसे सामोरे जावे याकरता तुरुंग प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन धोरण तयार केले होते; पण आपत्ती व्यवस्थापनाची विशिष्ट प्रकारची माहिती त्यात अद्ययावत नव्हती. नुकताच केरळमध्ये महापूर आला होता. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. पुराच्या वेळी केरळच्या तुरुंग प्रशासनाने कैद्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या? तुरुंगात पाणी शिरल्याने कैद्यांना कोठे स्थलांतरित केले? आदी गोष्टींचा अभ्यास आता राज्याचे तुरुंग प्रशासन करणार आहे. त्यासाठी प्रशासनाचे एक पथक लवकरच केरळला जाणार आहे. तिथे पाहणी करून ते अहवाल तयार करतील. तो अप्पर पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) यांना सादर केला जाणार आहे.

तुरुंगाच्या बांधकामामध्ये बदल करण्याचे अधिकार
आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात, याकरता स्थानिक अग्निशमन दल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह पोलिसांचे मार्गदर्शन घ्यावे लागणार आहे. आणीबाणीच्या स्थितीत तुरुंगाच्या बांधकामांमध्ये बदल करण्याचे अधिकार कारागृह महानिरीक्षकांना आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT