मुंबई

तुमच्या मदतीशिवाय 'तीरा' तिचा दुसरा वाढदिवस साजरा करू शकणार नाही, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी

सुमित बागुल

मुंबई : ही बातमी वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही. ही बातमी वाचून तुम्हाला तुमची दुःखं कदाचित ठेंगणी वाटतील. बातमी काळजाचा ठोका चुकवणारी.

तीरा कामत नामक एक पाच महिन्यांची लहानगी सध्या मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. तीराला एसएमए टाइप 1 हा आजार आहे. हा आजार अत्यंत दुर्मिळ असा आजार मानला जातो. या आजाराने ग्रस्त कोणतंही बाळ 18 महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतं असं डॉक्टर्स सांगतात.

यावर उपचार अजिबात नाहीत असं नाही. या आजारावर एक इंजेक्शन आहे, जे तीराला यातून बाहेर काढू शकतं. मात्र या औषधाची किंमत ऐकाल तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तीराला जे इंजेक्शन हवं आहे त्याची किंमत तब्बल १६ कोटी रुपये इतकी. तीरासाठी खास अमेरिकेतून हे इंजेक्शन भारतात आयात करावं लागणार आहे. त्यामुळे त्यावरील आयात कर पकडून हे इंजेक्शन आणखीनच महाग होऊ शकतं. 

नक्की काय आहे एसएमए टाइप 1 आजार ? 

  • एसएमए टाइप 1 हा 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' म्हणजे अत्यंत दुर्मिळ असा आजार असल्याचं डॉक्टर्स सांगतात
  • एसएमए म्हणजेच स्पायनल मस्क्युलर अँट्रोफी (Spinal Muscular Atrophy )
  • आपल्या शरीरात एखादा स्नायू कार्यरत ठेवण्यासाठी विशेष जीन्सची/जनुकांची आवश्यकता असते. 
  • शरीरातील याच जीन्सच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रोटीन तयार होतं आणि ज्यामुळे शरीरातील स्नायू कार्यरत राहतात. 
  • ज्या नवजात बालकांना एसएमए पद्धतीतीतील आजार असतात त्यांच्या मेंदूपर्यंत संदेश पोहोचत नाहीत.
  • सोबतच मेंदूच्या पेशी किंवा मज्जासंस्था आणि पाठीचा कणा देखील काम करू शकत नाही 
  • तीरा कामत या पाच महिन्यांच्या लहानगीच्या शरीरात स्नायूंना कार्यरत ठेवण्यासाठीचे जीन्स (जनुके) नाहीत.  
  • कालांतराने अशा बालकांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. 

तीराच्या कुटुंबाकडून इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मदतीने निधी उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय. तीराच्या कुटुंबाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील मदत मागितली गेलीये. 

तुम्हालाही तीराला मदत करायची असल्यास वरील इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन विविध डोनेशनच्या लिंक्स प्राप्त होऊ शकतात

किंवा

emotional story from mumbai teera kamat needs injection worth 16 crore to cure sma type one

तुमच्या मदतीशिवाय 'तीरा' तिचा दुसरा वाढदिवस साजरा करू शकणार नाही, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT