employees of State Transport Co Operative Bank strike 5 september st employee salary mumbai  sakal
मुंबई

Mumbai News : एसटी बँकेच्या संपाचा तिढा सुटेना; राज्य सरकारकडून मध्यस्तीच्या प्रयत्नाची शक्यता

स्टेट ट्रान्सपोर्ट को आॅपरेटीव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबर पासून अघोषीत संप पुकारला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्टेट ट्रान्सपोर्ट को आॅपरेटीव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबर पासून अघोषीत संप पुकारला आहे. परिणामी बँकेचे कार्यालयीन आणि आर्थिक कामकाजावर परिणाम झाला आहे. बँक प्रशासनाने कर्मचारी युनियन आणि कर्मचाऱ्यांना जाहिर नोटीस बजावल्या असून, कर्मचारी मात्र अद्याप कामावर रूजू झाले नसल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा वाढला आहे.

बँक कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता संप पुकारल्याचा आरोप बँक प्रशासनाने केला आहे. त्यामूळे १४ सप्टेंबर रोजी एसटी प्रशासनाक़डून जाहीर नोटीस बजावण्यात आल्या आहे. बँकेच्या संचालक मंडळाकडून घेण्यात आलेले ठराव वादग्रस्त असून, बँकेच्या हिता विरूद्घ असल्याचा आरोप बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

या सर्व प्रकरणाचा तिढा सुटत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याशिवाय सभासद, ठेवीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामूळे या वादाचा तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारक़डून दखल घेत येत्या आठव़ड्यात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित बैठक बोलवण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : इस्रायल-इराण संघर्ष परिस्थितीमुळे लोकांसाठी आम्ही वेबसाइट आणि हेल्पलाइन नंबर जारी केलाय - गिरीश महाजन

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT